शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

श्रींचा पालखी सोहळा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 00:54 IST

येथे महाशिवरात्र महोत्सवानिमित्त श्री नागनाथ ज्योतिर्लिंगाची पालखी मिरवणूक सोमवारी रात्री ८ वाजता काढण्यात आली. या सोहळ्याला भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : येथे महाशिवरात्र महोत्सवानिमित्त श्री नागनाथ ज्योतिर्लिंगाची पालखी मिरवणूक सोमवारी रात्री ८ वाजता काढण्यात आली. या सोहळ्याला भाविकांनी मोठी गर्दी केली होती.रवळेश्वर मामा यांच्या भेटीसाठी गावातून सजावट करून पालखी काढली. यामध्ये भजनी पथक, भजनी मंडळे, बँड पथक अन्य भाविक महिला यांच्यासह गावातून मुख्य मार्गाने वाजत-गाजत रवळेश्वर मामांकडे जाऊन नंतर मंदिरामध्ये पोहोचली. सायंकाळी ८ वाजता निघालेली पालखी नागनाथ मंदिरामध्ये अध्यक्ष तथा तहसीलदार पांडुरंग माचेवाड, सहसचिव विद्याताई पवार, विश्वस्त गजानन वाखरकर, अ‍ॅड. मुंजाभाऊ मगर, डॉ.किशन लखमावर ,गणेश देशमुख, विश्वस्त देविदास कदम डॉक्टर पुरुषोत्तम देव सल्लागार, शिवाजी देशपांडे, सल्लागार डॉ.विलास खरात आदींच्या उपस्थितीमध्ये पालखीचे विधीवत पूजन करण्यात आले. श्रींची अतिशय सुबक सुंदर आणि पूर्ण सजावट केलेली मूर्ती पालखीमध्ये पुजारी श्रीपाद भोपी, आदित्य भोपी, नारायण भोपी, महादेव गोरे, रमेश गुरव, पुरोहित उन्मेष भोपी, श्रीपाद दीक्षित, महेश जोशी, महंत श्यामगिरी महाराज, महंत सुरेश गिरी महाराज अन्य परिसरातील सर्व गावकरी व भजनी मंडळे तसेच महिलांची संख्याही लक्षणीय होती. पालखी मुख्य मार्गावरून जात असताना गावातील महिलांनी आपल्या मुख्य दरवाजासमोर श्रींच्या पालखीचे औक्षण करून पूजाअर्चा करीत होत्या. चौका चौकांमध्ये विविध प्रकारची गवळणी भजनेही सादर केली.अशा आनंदाच्या उत्साहाच्या भरात पालखी रात्री १२ वाजता मंदिरामध्ये पोहोचली. त्यानंतर सर्व भजनी मंडळांना प्रसाद वाटप करून करण्यात आले. यावेळी मंदिरातील अधीक्षक वैजनाथ पवार, व्यवस्थापक शंकर काळे, उपव्यवस्थापक बापूराव देशमुख, सुरक्षा गार्ड महिला, सुरक्षा गार्ड कर्मचारी व गावातील खूप मोठ्या संख्येने गावकरी शिवभक्त उपस्थित होते. त्यामुळे पालखी सोहळ्यामध्ये रंगत आली होती.

टॅग्स :Mahashivratriमहाशिवरात्रीTempleमंदिर