शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

सभापतींवरील अविश्वासासाठी ४ जूनला विशेष सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:30 IST

सभापती चव्हाण यांच्या जिल्हा परिषद अंतर्गत कामकाजावर नाराजी व्यक्त करीत जि.प.सदस्य संजय देशमुख यांच्यासह ४३ सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल ...

सभापती चव्हाण यांच्या जिल्हा परिषद अंतर्गत कामकाजावर नाराजी व्यक्त करीत जि.प.सदस्य संजय देशमुख यांच्यासह ४३ सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अधिनियम १९६१ चे कलम ८७ अन्वये हा ठराव दाखल केला आहे. उक्त ठरावावर विचार करुन सभा बोलविण्यात यावी, असे नमूद केले आहे. यावरून जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी ८ जून रोजी दुपारी १२ वाजता विशेष सभा बोलावण्याचा आदेश दिला आहे. तर अविश्वास ठराव प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अधिनियमातील कलम ४९ (४) नुसार पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांना प्राधिकृत केले आहे.

जिल्हा परिषदेत आज यामुळे वातावरणात पुन्हा गरमागरमी दिसून येत होती. तर प्रशासकीय पातळीवरही आधी जि.प.च्या सभागृहात पाहणी करण्यात आली. मात्र हे सभागृह नादुरुस्त असल्याने स्थळ बदलून जिल्हा नियोजन समिती सभागृहात सभेचे आयोजन करण्यात आले.

ज्या एकजुटीने सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. ती कायम ठेवण्यासाठी प्रयत्न होत होते. तर दुसरीकडे नेत्यांची मनधरणी करून अविश्वास टाळण्यासाठी सभापतींचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र सदस्य नेत्यांनाच पटवून देताना दिसत आहेत. आता ८ जून रोजीच चव्हाण यांचे भवितव्य ठरणार आहे.