शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी खुद्द एसपीच उतरले मैदानात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 18:53 IST

शहरातील मुख्य रस्त्यावरच वाहने उभी केली जातात. त्यामुळे ये-जा करणाऱ्या वाहतुकीस अडथळा हाेताे, शिवाय वाहतूक काेंडीमुळे नेहमीच अपघाताच्या घटना घडतात.

ठळक मुद्देदुकानाबाहेर माल ठेवण्यास मनाईपार्किंगची व्यवस्थ करा

हिंगोली : शहरातील वाहतूक काेंडीची समस्या नागरिकांची डाेकेदुखी बनली आहे, या मथळ्याखाली ‘लाेकमत’ने २९ ऑक्टाेबर राेजी बातमी प्रकाशित केली हाेती. या वृत्ताची पाेलीस प्रशासनाने दखल घेतली आहे. ३० ऑक्टाेबर राेजी पाेलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी शहरात फेरफटका मारून प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली. 

शहरातील मुख्य रस्त्यावरच वाहने उभी केली जातात. त्यामुळे ये-जा करणाऱ्या वाहतुकीस अडथळा हाेताे, शिवाय वाहतूक काेंडीमुळे नेहमीच अपघाताच्या घटना घडतात. त्यामुळे वाहतुकीला शिस्त लागावी, वाहतुकीची काेंडी हाेईल अशा पद्धतीने काेणीही वाहने उभी करू नयेत, असे आवाहन पाेलीस अधीक्षक कलासागर यांनी केले आहे.

यासंदर्भात वाहतूक शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. पाेलीस अधीक्षक कलासागर यांनी हिंगाेली शहरातील महात्मा गांधी चाैक, महावीर स्तंभ परिसर तसेच इंदिरा गांधी चाैक यासह विविध भागात फेरफटका मारून वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेतला. शहरातील रस्ता रूंदीकरणाचे कामे झाली तरीही शहरातील वाहतूक काेंडीचा प्रश्न अद्याप तसाच आहे. वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी हिंगाेली वाहतूक शाखेकडून यापूर्वी अनेकदा कारवाई करण्यात आली, शिवाय रस्त्यालगतचे अतिक्रमणही काढण्यात आले. वर्दळीच्या ठिकाणी  वाहतूक समस्या कायम आहे. आता खुद्द पोलीस अधीक्षकच रस्त्यावर उतरल्याने वाहतुकीच्या शिस्तीसाठी नागरिकही सकारात्मक प्रतिसाद देतील, अशी अपेक्षा आहे. हातगाडेधारकांनाही शिस्त लावण्याची गरज आहे.

दुकानदारांनाही दिल्या सूचनाशहरातील मुख्य बाजारपेठेत अनेक दुकानदारांनी दुकानाबाहेर साहित्य ठेवल्याने पार्किंग थेट रस्त्यावर जाते. त्याचा परिणाम म्हणून वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे दुकानाबाहेर साहित्य ठेवू नये, अशा सूचना पोलीस अधीक्षक कलासागर यांनी काही विक्रेत्यांना दिल्या. तर वन वे असून अंमल होत नसल्याने त्यावरही कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीHingoliहिंगोलीHingoli S Pपोलीस अधीक्षक, हिंगोली