शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

खोडमाशीपासून सोयाबीन जपा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 00:06 IST

मराठवाड्यात सोयाबीन हे प्रमुख पीक असून गतवर्षी चक्रीभुंगा व खोडमाशीने या पिकाचे मोठे नुकसान झाले होते. यंदा सुरुवातीपासूनच कीड व्यवस्थापन करण्याचे उपाय वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने सुचविले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मराठवाड्यात सोयाबीन हे प्रमुख पीक असून गतवर्षी चक्रीभुंगा व खोडमाशीने या पिकाचे मोठे नुकसान झाले होते. यंदा सुरुवातीपासूनच कीड व्यवस्थापन करण्याचे उपाय वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने सुचविले आहेत.जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत्र सव्वा दोन लाख हेक्टरच्या आसपास असते. या पिकाची उगवण झाल्यावर लगेच खोडमाशीचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे उत्पादनात मोठी घट येते. अंड्यातून अळी निघाल्यानंतर बीजदल पोखरते. नंतर ती मुख्य खोडामध्ये शिरते. त्यामुळे अशी रोपे कोमेजतात व वाळून जातात. पीक मोठे झाल्यावर या किडीचा प्रादुर्भाव लवकर लक्षात येत नाही. तर चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव जुलै ते आॅक्टोबर या कालावधीत आढळतो. अळी पानाचे देठ, खोड पोखरून आत शिरते. त्यामुळे प्रादुर्भावग्रस्त भाग सुकून जातो. या दोन्हींचा प्रादुर्भाव लवकर लक्षात येत नाही. तर किडी खोडामध्ये राहात असल्याने व्यवस्थापन करणे अवघड जाते. त्यामुळे आता पेरणीपासूनच काळजी घेणे गरजेचे असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. त्यात शेतातील काडीकचरा वेचून नष्ट करावा. सोयाबीन पेरणी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत संपायला हवी. सुरवातीच्या अवस्थेत पीक तणमुक्त ठेवायला हवे. प्रादुर्भावग्रस्त पाने, फांद्या आतील किडीसह नष्ट कराव्यात, पेरणी करताना जमिनीमध्ये फोरेट १0 टक्के सीजी हे १0 किलो प्रतिहेक्टर याप्रमाणे जमिनीत मिसळावे, किडींचा प्रादुर्भाव आढळून आल्यास ट्रायझोफॉस ४0 ईसी १२ मिली किंवा क्लोरॅनट्रानीलीप्रोल १८.५ एससी ३ मिली याची फवारणी करावी, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक व्ही.डी. लोखंडे यांनी केले आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी