नांदेड ते कळमनुरी (एमएच २० - बीएल ०१२१) ही बस ६ सप्टेंबर रोजी नांदेड येथून सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास हिंगोलीकडे निघाली. या दरम्यान अचानक मुसळधार पाऊस सुरू झाल्याने, प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. कळमनुरी डेपोच्या बसला गळती लागल्याने बसमधील प्रवाशांनी चक्क छत्रीचा आधार घेतला. ज्या प्रवाशांनी धावपळ करून बसमध्ये जागा पकडली होती. त्यांनी आपली जागा सोडून बसमध्ये उभे राहणे पसंत केले. बसला गळती लागल्याने एसटी महामंडळाने भंगार बसेसवर ताडपत्री अंथरावी, अशी मागणी संतप्त झालेल्या प्रवाशांनी केली. बसमधील प्रवासी भीमा सूर्यतळ, गोलू भालेराव यांनी पावसाच्या पाण्यामुळे बसला गळती लागल्याने संताप व्यक्त केला. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, म्हणून बस दुरुस्तीची मागणी वाहकाकडे त्यांनी केली. एकंदर बसच्या गळतीमुळे चालक व वाहकालाही त्रास सहन करावा लागला.
फोटो ४१