शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

काही भागांत कामे सुरू; मजूरांचा मात्र पत्ता नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 00:50 IST

रोहयोची मजूर उपस्थिती ६४ हजारांवर; दुष्काळ!

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मागील दोन महिन्यांत हळूहळू वाढत चाललेली साप्ताहिक मजूर उपस्थिती शेवटच्या टप्प्यात ६४ हजारांवर पोहोचली. यामुळे दररोज किमान सहा हजार मजूर रोहयोच्या कामांवर येत असल्याचे दिसून येत आहे. दुष्काळी परिस्थितीत याचा मजुरांना दिलासा मिळत आहे. मात्र काही भागात मजुरांविनाच ही कामे सुरू असल्याचेही चित्र आहे.हिंगोली जिल्ह्यातील बहुतांश भागात विदारक दुष्काळी चित्र आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात दिवाळीनंतर अनेक भागात मजुरांकडून कामांची मागणी होताना दिसत होती. वाट पाहून थकलेल्या मजुरांनी स्थलांतराचा मार्ग पत्करला. तशाही जिल्ह्यातील काही भागातील ऊसतोड कामगारांच्या टोळ्या दरवर्षीच स्थलांतर करतात. मोठ्या शहरात बांधकामावर काम करणारे मजूर अधून-मधूनच गावाकडे हजेरी लावतात. यंदा दुष्काळामुळे शेतमजुरांसह शेतकऱ्यांनाही एकतर रोहयोचे काम अथवा स्थलांतर असे दोनच पर्याय होते. मात्र रोहयोचे काम सुरू नसल्याने अनेकांनी स्थलांतराचा मार्ग पत्करला. तर काहींनी गावातच राहून प्रतीक्षा केली. अशांना आता रोहयोच्या कामावर गावातच मजुरी मिळत आहे. या कामांची संख्याही आता वाढत चालली आहे. ग्रामपंचायतींनी कामांचा हजाराचा आकडा ओलांडला आहे. सेनगाव तालुक्यात सर्वाधिक ३0९ कामांवर २१ हजार साप्ताहिक मजूर उपस्थिती आहे. तर औंढ्यात सर्वांत कमी २४१५ मजुरांची उपस्थिती आहे. यंत्रणांच्या कामांची संख्याही वाढली आहे. यंत्रणांनी २३६ कामे सुरू केली असून ६३२0 मजुरांची उपस्थिती आहे. एकूण साप्ताहिक मजूर उपस्थिती ६४ हजार ८0२ च्या घरात पोहोचली आहे.जिल्ह्यात काही भागात विदारक दुष्काळी चित्र निर्माण झाल्याने मात्र अख्खे गावेच कामाच्या शोधात स्थलांतरीत झाले. विशेष म्हणजे मजूरवर्गाला हाताला काम मिळत नसल्याने दिवाळीनंतर स्थलांतराचे प्रमाण वाढले होते. ऊसतोडीसाठी तसेच वीटाच्या कारखान्यांवर मजूर कामासाठी गेले. यंदा अत्यल्प पर्जन्यमानामुळे बळीराजा हतबल झाला. शेतीत मजूरी करणाºयांचे हाल होत आहेत. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत जिल्ह्यातून मोठ्या संख्येने स्थलांतर झाले. सध्या रोहयोच्या कामांमुळे मजूरांना दिलासा मिळाला.काही भागात मात्र कामे सुरू असली तरीही त्यावर मजुरांचा पत्ता नसल्याचे चित्र आहे. गावात मजूर उपलब्ध असताना त्यांनाही काम दिले जात नसून कामे मात्र होत आहेत. काही ठिकाणी बाहेरून मजूर आणण्याचा फार्सही होत आहे. ही कामे करताना स्थानिक कामगारांना कामे मिळण्यासाठीही तेवढेच दक्ष राहण्याची काळजी यंत्रणांनी घेण्याची गरज आहे. मजुरांच्या कामाच्या मागणीची चाचपणी तरी निदान होणे गरजेचे आहे.

टॅग्स :Revenue Departmentमहसूल विभागwater shortageपाणीटंचाई