शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

सेवा देताना सामाजिक बांधिलकी जोपासावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 00:40 IST

नागरिकांना सेवा देतांना सामाजिक बांधिलकी जोपासणे महत्त्वाचे असून, प्रशासकीय कामे पार पाडतांना जबाबदारीचे भान जोपासणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिणीयार यांनी केले.     

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : नागरिकांना सेवा देतांना सामाजिक बांधिलकी जोपासणे महत्त्वाचे असून, प्रशासकीय कामे पार पाडतांना जबाबदारीचे भान जोपासणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिणीयार यांनी केले.                  जिल्हाधिकारी कार्यालयातील डी.पी.सी. सभागृहात आयोजित नागरी सेवा दिन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी लतीफ पठाण, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) पांडुरंग बोरगावकर, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) गोविंद रणवीरकर आदी उपस्थित होते.  राज्याच्या, देशाच्या विकासात प्रशासकीय यंत्रणेचे मोठे योगदान आहे. दैनंदिन प्रशासकीय कामकाज पार पाडतांना मानवी आस्था जपणे खुप आवश्यक आहे. उदारीकरणाच्या धोरण स्विकारल्यानंतर नागरी विकासाच्या अनुषंगाने प्रशासनाचे स्वरुपही बदलले आहे. लोककल्याणकारी राज्याची संकल्पनाही बदलली. शिक्षण आणि नागरिकांना झालेल्या अधिकारांची जाणीव यामुळे परस्थिती बदलली आहे. यापुढे प्रशासनातील विविध घटकांना नागरिकांना सेवा देण्याचे दायित्त्व स्विकारावेच लागणार असल्याचे अप्पर जिल्हाधिकारी मनीयार यांनी सांगितले. ग्राम स्वराज्य योजना आणि ग्राम विकास परिवर्तत अभियान बाबतही त्यांनी माहिती दिली.उपजिल्हाधिकारी बोरगावकर म्हणाले २१ एप्रिल १९४७ रोजी देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिल्लीच्या मेटकाफ हाऊस येथे भारतीय प्रशासकीय सेवेतील पहिल्या तुकडीतील अधिकाऱ्यांना संबोधित केले होते. त्यानिमित्त नागरी सेवा दिन सर्वत्र साजरा करण्यात येतो. नव्या भारताची उभारणी हे या दिनाचे घोषवाक्य होय. नागरिकांच्या सनदीनुसार नागरीक हा राजा आहे. त्यांच्यासाठीच आपण सर्वजण प्रशासकीय सेवेत काम करीत आहोत. त्यामुळे शासकीय अधिकारी-कर्मचाºयांनी कर्तव्याची जाणीव ठेऊन या दिनाचा मुख्य उद्देश समजून घ्यावा असे त्यांनी सांगितले. तसेच शासन यंत्रणेतील व्यवहारात पारदर्शकता यावी, भ्रष्टाचाराचे समूळ निर्मूलन व्हावे, कार्यपद्धती, नियम व इतर शासकीय कामांमध्ये गैरव्यवहारास वाव राहू नये, शिवाय जनतेला साशंकता वाटू नये व त्यांची कामे विनाविलंब अपेक्षित आहेत असेही बोरगावर म्हणाले.कार्यालयीन वेळेबाबत कर्मचारी अनभिज्ञ४अनेक शासकीय कर्मचाºयांना कार्यालयीन वेळ देखील माहिती नाही. शासकीय कर्मचारी यांची कार्यालयीन वेळ ही सकाळी ९.४५ असून, सदर कर्मचारी ९.५५ नंतर कार्यालयात आल्यास त्यास लेट मस्टर मध्ये स्वाक्षरी करणे बंधनकारक आहे. तसेच ३ वेळेस उशीरा आल्यास १ दिवसाची किरकोळ रजा घेणे हा नियम आहे. परंतू याबाबत अनेकजण अनभिज्ञ आहेत. प्रशासकीय यंत्रणेवर अनेक महत्वाची सेवा पुरविण्याचे कामे सोपविण्यात आले असून या सेवा नागरिकांना देण्यासाठी कालमयार्दा निश्चित केलेली आहे. त्याकरीता प्रशासकीय यंत्रणांनी त्यांच्यावर सोपविण्यात आलेली कामे अचूक व वेळत पार पाडण्याचा प्रयत्न करावा असेही बोरगावकर म्हणाले.

टॅग्स :HingoliहिंगोलीHingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली