शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून एफएक्यू केंद्राची मात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 00:11 IST

हमीभाव न दिल्यास व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या निर्णयानंतर निर्माण झालेला पेच सोडविण्यासाठी आता एफएक्यू व नॉन एफएक्यू दर्जाचा माल वेगवेगळ्या ठिकाणी विकण्याचे आवाहन शेतक-यांना केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : हमीभाव न दिल्यास व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या निर्णयानंतर निर्माण झालेला पेच सोडविण्यासाठी आता एफएक्यू व नॉन एफएक्यू दर्जाचा माल वेगवेगळ्या ठिकाणी विकण्याचे आवाहन शेतक-यांना केले आहे. दर्जाची तपासणीही शेतक-यांनीच करून घ्यायची असून त्यासाठीची यंत्रणा तर आली मात्र कार्यान्वित नाही. त्यानंतरही ती खरेच तपासणी करून देईल का, हा प्रश्नच आहे.हिंगोलीच नव्हे, राज्यात सर्वत्रच हमीभावाचा मुद्दा चिघळला होता. व्यापा-यांनी मोंढ्यात खरेदी बंद केली होती. ऐन सणासुदीत शेतकरीही अडचणीत आले होते. एकीकडे हमीभावाने खरेदी न केल्यास व्यापाºयांवर गुन्हे दाखल करण्याचा मंत्रिमंडळ निर्णय झाला तर दुसरीकडे हे प्रकार सुरू झाले. त्यानंतर तोडगा काढण्यासाठी मुंबईपर्यंत बैठका झाल्या. यानंतर बाजार समितीने एफएक्यू दर्जाचा माल शासनाच्या नाफेडकडील हमीभाव केंद्रावर विक्री करावा व नॉन एफएक्यू दर्जाचा माल भुसार मोंढ्यात विकावा, असे आवाहन केले.या मालाची प्रतवारी तपासणी करण्याचे यंत्र नाफेडचे केंद्र सुरू होण्याच्या ठिकाणी संत नामदेव मार्केट यार्डात आले. मात्र ते कधी सुरू होणार? त्यासाठीच्या मनुष्यबळाची जुळवाजुळव झाली का, याचा कुणालाच पत्ता नाही. सध्या हे केंद्र लवकरच सुरू होणार असल्याचे तेवढे सांगितले जात आहे.शेतकºयांचीच गोची : हमीभाव अधांतरीचशासनाच्या हमीभाव केंद्रावर उच्च प्रतीचा मालच खरेदी होणार आहे. त्यामुळे इतर शेतकºयांचा माल चांगल्या प्रतीचा असला व त्याला अत्यंत निकड असल्याने नाफेडच्या रांगेत उभे राहता येत नसेल तर तो खराब समजूनच मोंढ्यात व्यापारी खरेदी करतील. या निर्णयामुळे तर शेतकºयांची पुरती माती होणार आहे.शासनाने एक प्रकारे आयते कोलीत हाती दिल्याचा हा प्रकार म्हणावा लागेल. जर एखाद्या शेतकºयाने हमीभाव केंद्रावर माल तपासला तरीही व्यापारी कसा भरवसा ठेवणार, हाही प्रश्नच आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा सुळावर चढणार आहे.आज भुसार मोंढ्यात ३0, तूर ५0, उडीद २५, मूग ३00, गहू ६0 तर ज्वारी २0 क्विंटल आली. यात सोयाबीन-३३८0, तूर ३६00, उडीद ३२00, मूग ५६00, गहू-२१५५, ज्वारी १५८0 रुपये हे कमाल भाव होते.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी