शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सहा संचालकांचे राजीनामे मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 00:36 IST

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ९ संचालकानी १६ आॅगस्ट ला राजीनामे दिले असून त्या पैकी ६ संचालकांचे राजीनामे शनिवारी सभापती डॉ. निळंकठ गडदे यांनी मंजूर केले. उर्वरित तिन संचालकांचे राजीनामे मंजूरीची प्रक्रिया करण्यासाठी प्रंलबीत ठेवले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कसेनगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ९ संचालकानी १६ आॅगस्ट ला राजीनामे दिले असून त्या पैकी ६ संचालकांचे राजीनामे शनिवारी सभापती डॉ. निळंकठ गडदे यांनी मंजूर केले. उर्वरित तिन संचालकांचे राजीनामे मंजूरीची प्रक्रिया करण्यासाठी प्रंलबीत ठेवले आहेत. सेनगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सध्या अस्तिवात आलेले संचालक मंडळ तिन वषार्पूर्वी झालेल्या निवडणूकीच्या माध्यमातून सत्तेवर आले.लोकशाही मार्गाने आलेल्या या सत्तेची सुत्रे बाजार समितीच्या विकासासाठी भाजपचे आ. तान्हाजी मुटकुळे व माजी आ. भाऊराव पाटील गोरेगावकर गटाकडे मतदारांनी सोपवली; पंरतु या दोन गटाचा युती मधील सत्तेची तडजोड अन् विरोधी गटाने सत्ताधारी संचालकाविरोधात अपात्रेतेची दाखल केलेली प्रकरणे त्यावर झालेली कारवाई यामुळे तीन वर्षात बाजार समितीच्या राजकारणातील सघंर्ष टोकाला गेला आहे. शेतकरी हिताचे बाजार समिती ,विकासाचे निर्णय कमी झाले. त्याउलट सत्तेचा सारीपाटच तीन वर्षरंगत गेला. सत्तेच्या राजकारण सत्ताधारी संचालकानी त्याचा गटाच्याच सभापती डॉ. निळकंठ गडदे यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणला. सभापती गडदे यांनी विरोधी संचालकाची मदत घेवून हा ठराव बारगळवला. अशा परिस्थितीत सत्ताधारी संचालकानी सामूहिक राजीनामे दिले असून बाजार समिती चे संचालक मंडळ बरखास्त करण्याचे राजकीय गणित माडले आहे. या राजकीय डावात आ. मुटकुळे यांनी स्व:तहा उडी घेतली. माजी आ. भाऊराव पाटील गोरेगावकर हे मात्र दोन्ही बाजूंनी काँग्रेसचेच संचालक असल्याने घडामोडीत अलिप्त राहिले आहेत.आगामी काळात सत्तेचे राजकारण कोणत्या वळणावर जाणार हे पहावे लागणार आहे. असे असले तरी या राजकारणात बाजार समिती हिताचे कोणत्याच गटाला काही देणे घेणे नसून राजकारणासाठी आर्थिक नाडी मजबूत करणाऱ्या सेनगाव बाजार समितीच्या कारभाराचे शेतकरी हिताच्या धोरणांचे राजकारणाने मात्र कंबरडे मोडले आहे. राजीनामे देवून प्रशासकीय संचालक मंडळ आणण्याचा डाव भाजपचा गटाचे यशस्वी होतात का? सभापती गडदे हे सत्ता आणि पद कसे राखतात याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.९ संचालकांचे १६ आॅगस्ट रोजी राजीनामे९ संचालकानी १६ आॅगस्टला राजीनामे दिले असून त्या पैकी ६ संचालकाचे राजीनामे शनिवारी सभापती डॉ.निळकंठ गडदे यांनी मंजूर केले. यामध्ये अमोल चंद्रकांत हराळ, शिक्षण सभापती संजय देशमुख, माजी सभापती शंकरराव बोरुडे, कांतराव कोटकर, गोदावरी शिंदे, द्वारकदास सारडा आदी सहा संचालकाचे राजीनामे मंजूर केले. संचालक गोपाळराव देशमुख, गिरीधारी तोष्णीवाल, सुमित्रा नरवाडे या तीन संचालकांचे राजीनामे प्रलंबित ठेवले आहेत. या तीन्ही संचालकांचे राजीनामे संबंधी कार्यलयीन प्रकीयेत बाकी असल्याने ते मंजूर झाले नाहीत, असे सभापती गडदे यांनी सांगितले. त्यामुळे बाजार समितीच्या संचालक मंडळाची संख्या दहावर येवून ठेपली आहे. एकुण १८ संचालकीय बाजार समितीमध्ये यापूर्वी एक रिक्त, एक मयत असे सोळा संचालक होते. सहा संचालकानी राजीनामे दिल्याने दहा संचालक कार्यरत राहिले.

टॅग्स :HingoliहिंगोलीMarket Yardमार्केट यार्ड