हिंगोली येथील जेतवन बुद्ध प्रशिक्षण केंद्राच्या वतीने पालकमंत्री वर्षा गायकवाड यांचा कोविड योद्धा म्हणून विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव भन्ते उपगुप्त महाथेरो भंते विनयबौधीप्रिय भंते पय्यारत्न, खा. राजीव सातव, आ. राजू नवघरे, सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ हत्तींबिरे, जि. प. सदस्य सतीश पाचपुते, एस. पी. राठोड, संजय दराडे यांच्यासह विलास गोरे, गणेश लुगे आदींची उपस्थिती होती.
हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येक धर्म स्थळांच्या विकासासाठीही प्रयत्न केला जात आहे. जेतवन बुद्ध प्रशिक्षण केंद्राचा विकास हा जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून केला जाईल, परंतु सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून या स्थळाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी समाजाने एकजूट होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान बुद्धांचे विचार जास्तीत जास्त विकसित करण्याचा प्रयत्न करावा ,असे आवाहन उपस्थितांना केले, कारण हेच विचार आजच्या समाज विघातक शक्तींचा सामना करतील असे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन पत्रकार प्रकाश इंगोले यांनी केले तर शेवटी आभार भंते पय्यारत्न यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नंदकिशोर कांबळे जी. के. इंगोले, जळबा शेवाळे, अंबादास वानखेडे व सुप्रिया महिला मंडळ, युवक मंडळाच्या वतीने करण्यात आले. फाेटाे नं. ०६