शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! पाण्याच्या वादातून शेतकऱ्याचा खून; दोन आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 18:47 IST

सातेफळ येथील शेतात असलेल्या सामायिक विहिरीवरून पाणी घेण्यावरून वाद होता.

ठळक मुद्देया घटनेनंतर हे प्रकरण आपसात तडजोडीने मिटविण्याचाही प्रयत्न झाला.

वसमत : तालुक्यातील सातेफळ येथे सामायिक विहिरीवरून भिजवणीसाठी पाणी घेण्याच्या वादातून २२ नोव्हेंबर रोजी खून झाला. याप्रकरणी २५ नोव्हेंबरला हट्टा पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. दोन आरोपींना अटक झाली असून न्यायालयाने आरोपींना २९ नोव्हेंबरपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सातेफळ येथील शेतात असलेल्या सामायिक विहिरीवरून पाणी घेण्यावरून वाद होता. या वादाच्या पार्श्वभूमीवर २२ नोव्हेंबर रोजी मोटर लावून भिजवण करत असलेल्या शेतकरी पंजाब व्यंकटराव अंभोरे (वय ३२) यांच्या डोक्यात लाकडाने मारून ठार केल्याची घटना घडली. या घटनेनंतर हे प्रकरण आपसात तडजोडीने मिटविण्याचाही प्रयत्न झाला.

अडीच एकर शेतजमिनीची रजिस्ट्री करून देण्यावर तडजोडीची चर्चाही होती. त्यातून खून प्रकरणाची तक्रार हट्टा ठाण्यात दोन दिवस देण्यात आली नाही. तडजोडीच्या वाटाघाटी फिसकटल्यानंतर २५ रोजी हट्टा ठाण्यात खून प्रकरणाची तक्रार देण्यात आली. मयताची पत्नी विद्या पंजाब अंभोरेच्या तक्रारीवरून आदिनाथ अंभोरे, श्रीधर अंभोरे या दोघांविरोधात खुनाचा गुन्हा नोंदविला आहे. त्यांना न्यायालयासमाेर उभे केले असता, २९ नोव्हेंबरपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. सामायिक विहिरीवर मोटार लावण्याच्या कारणावरून रागाच्या भरात एकाचा खून करण्याचा प्रकार घडला. मात्र तो दडपून टाकण्याचाही प्रकार झाला होता. तडजोड न झाल्याने ही बाब उजेडात आली आहे.

...अन् विहिरीसह जमीन देण्याची तयारीभावकीतील भांडणे व वाद किती विकोपाला जातात, याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. दोन कुटुंबांतील सामायिक विहिरीला पाणी एवढे आहे की, दोन्ही मोटारी लावल्या तरी उपसा हाेत नाही. असे असले तरी भावकीत वादावाद व एकमेकांचा द्वेष यावरून वाद हाेत असे. या घटनेच्या एक दिवस अगोदरच दोन्ही कुटुंबांत वाद झाला होता. ग्रामस्थांनी प्रकरण मिटविले होते. दुसऱ्या दिवशी मोटार लावल्याने राग अनावर झाल्याने डोक्यात लाकडाने मारून खुनाची घटना घडली. याप्रकरणी तडजाेडीसाठी विहिरीसह दोन एकर दोन गुंठे जमीन मयताच्या नातेवाईकाला रजिस्ट्री करून देण्याची तयारी झाली असल्याचे वृत्त आहे. मात्र रजिस्ट्री करून दिल्यानंतरही प्रकरण मिटेल का नाही, यावरून पुन्हा मतभेद झाल्याने प्रकरण पोलिसांत गेले. ‘शेत गेले तरी हरकत नाही, पण धुरा गेला नाही पाहिजे’ या प्रमाणेच पाण्यासाठी खून झाल्यानंतर विहिरीवर पाणी सोडण्याची वेळ आल्याने हा चर्चेचा विषय ठरत आहे. भाऊबंदकीतील वाद विकोपाला जाऊ नये, याचाच धडा ही घटना देत आहे.

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणी