शिरडशहापूर : वसमत - शिरडशहापूर दरम्यान सिमेंट रस्त्याचे काम दोन वर्षांपासून सुरू आहे. बहुतांश रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. काम झालेल्या या रस्त्यावर ठिकठिकाणी भेगा पडलेल्या दिसत आहेत. एका वर्षाच्या आत या रस्त्यावर भेगा पडत असल्याने रस्त्याच्या कामाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शिरड ते वसमत या राज्य महामार्गाचे काम मागील दोन वर्षांपासून सुरू आहे. या रस्त्यावर कोट्यवधी रुपये खर्च करून सिमेंट रस्ता तयार करण्यात आला आहे. अजूनही या रस्त्यावरील काही पुलांचे काम अपूर्ण आहे. या रस्त्यावर एका वर्षात अनेक ठिकाणी भेगा पडल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी पडलेल्या भेगांमध्ये केमिकल टाकून भेगा बुजविण्यात येत आहेत. हे काम पूर्ण हाेण्याआधीच तडे जात असल्यामुळे कामाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. याबाबत संबंधित कंत्राटदाराला विचारले असता, या कामासाठी क्लाॅलिटी कंट्रोलचा स्वतंत्र विभाग काम पाहात आहे. रस्त्यावर भेगा का पडत आहेत, हे आम्हाला माहीत नाही. परंतु क्षमतेपेक्षा जास्त जड वाहने जात असल्यामुळे कदाचित असे होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.
फाेटाे नं ०१