शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणेचा सासरा आणि दीर दोघांना २८ मे पर्यंत पोलीस कोठडी
2
राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांना दिला असा कानमंत्र, आखली रणनीती, उत्तर देताना भाजपा नेत्यांची होणार पळापळ 
3
'राईचा पर्वत केला'; सरन्यायाधीश गवईंनी प्रोटोकॉल प्रकरणात याचिका करणाऱ्या वकिलाला झापले
4
पोलिसांकडून आरोपींना व्हीआयपी वागणूक; प्रकरणात काही राजकीय हस्तक्षेप आहे का? कस्पटे यांचा सवाल
5
Astrology: जून देणार 'या' पाच राशींच्या नशिबाला गती, येणार अच्छे दिन, बदलणार स्थिती!
6
IPL 2025 Final वरून मोठा राडा ! BCCI च्या निर्णयावर बंगाल सरकारचा घणाघाती आरोप
7
‘७५ वर्षं जगला, खूप झालं, आता पाकिस्तानचे फार दिवस उरलेले नाहीत’, योगी आदित्यनाथ यांचा इशारा 
8
IPL 2025: शुभमन गिल- ऋषभ पंतमध्ये वाद सुरू? मैदानातील व्हिडीओ समोर आल्यानंतर चर्चांना उधाण
9
मंत्री छगन भुजबळांना खाते मिळाले; आदेशाचा फोन खणखणताच लागलीच मुंबईकडे निघाले...
10
Shani Dosha: शनि महादशेचा त्रास तान्ह्या बाळांनाही होतो का? काय आहे त्यावर उपाय? जाणून घ्या!
11
राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता; महावितरणकडून ‘हाय अलर्ट’ जारी
12
रोहित- विराटनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती का घेतली? गंभीरनं एका वाक्यात दिलं उत्तर!
13
जसप्रीत बुमराहने वाढवलं BCCIचं टेन्शन, टीम इंडियातून इंग्लंड दौऱ्यावर फक्त इतकेच सामने खेळणार
14
ज्यांनी ट्रेनिग दिले त्यांनाच डसला! AI ने मायक्रोसॉफ्ट कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या घालविल्या
15
मुंबई-दिल्ली महामार्गावर कार थांबवली, महिलेसोबत सुरू केले अश्लील चाळे, भाजपा नेत्याचा व्हिडीओ व्हायरल 
16
२५ लाख रोजगार, ७५ हजार कोटींची गुंतवणूक! मुकेश अंबानी 'या' राज्यातील तरुणांचं बदलणार भविष्य
17
भारत पाकिस्तानला आणखी एक दणका देण्याच्या तयारीत; FATF ग्रे लिस्टमध्ये येणार पाक...
18
'धरीला पंढरीचा चोर' गाण्यातील 'मुक्ता'ने जिंकलं प्रेक्षकांचं मन! सध्या काय करते अभिनेत्री?
19
Ritual: 'हुंडा देणे' ही कुप्रथा भारतीय संस्कृतीत वा इतिहासात नव्हतीच, मग आली कुठून?
20
शेअर मार्केटमध्ये पैसे बुडाले? डिमॅट अकाउंट कायमचं कसं बंद करायचं? 'ही' आहे सोपी पद्धत

लाईक, शेअर, फॉरवर्ड जरा जपून; खावी लागू शकते जेलची हवा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क हिंगोली : अनेकजण व्यक्त होण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करतात. मात्र, कोणत्याही पोस्टला लाईक, शेअर अथवा फॉरवर्ड ...

लोकमत न्यूज नेटवर्क

हिंगोली : अनेकजण व्यक्त होण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करतात. मात्र, कोणत्याही पोस्टला लाईक, शेअर अथवा फॉरवर्ड करणे अंगलट येऊ शकते.

शांतता बिघडवणाऱ्या, जातीय तेढ निर्माण करणाऱ्या पोस्टला तुम्ही कळत-नकळत लाईक, शेअर आणि फॉरवर्ड केले तर तुम्हाला जेलची हवाही खावी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणतीही पोस्ट वाचून तिची योग्यता आणि समाजावर होणारे परिणाम लक्षात घेणे आवश्यक आहे.

प्रत्येकाकडे स्मार्टफोन आला असून, व्हॉट्सॲप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आदी सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. यातील काहीजण वेळ घालविण्यासाठी, व्यक्त होण्यासाठी सोशल मीडियाचा अधिकाधिक वापर करताना दिसतात. तसेच काही समाजभान नसलेल्या आणि विघ्नसंतोषी लोकांचाही मोठा भरणा आहे. ही मंडळी लहान, तीव्र, भडक तसेच जातीय तेढ निर्माण करणाऱ्या, शांतता भंग करणाऱ्या पोस्ट शेअर करण्यावर भर देतात. यातील एकही पोस्ट तुमच्याकडून चुकून शेअर झाली, लाईक किंवा फॉरवर्ड झाली तर तुमच्यावरही गुन्हा दाखल होऊ शकतो.

मुलींनो डीपी सांभाळा

काही तरूणी व्हॉट्सॲपसारख्या सोशल मीडियावर आपले स्वत:चे छायाचित्र डीपी म्हणून ठेवतात. मात्र, याच डीपीचा वापर करून सायबर गुन्हेगार अश्लील पोस्ट तयार करणे किंवा गैरवापर करून बदनामीचा प्रयत्न करू शकतात.

त्यामुळे तरूणींनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. आपल्या छायाचित्राचा गैरवापर टाळण्यासाठी स्वत:चे छायाचित्र न ठेवता निसर्गचित्र, सुभाषितांची छायाचित्रे ठेवणे कधीही योग्य ठरू शकते.

सोशल मीडियाचा वापर करा सांभाळून

फेसबुक, व्हॉट्सॲप, यू-ट्यूबच्या माध्यमातून वेगवेगळे प्रक्षोभक, अश्लील मेसेज शेअर होतात. लहान मुलांनाही व्हॉट्सॲप, फेसबुकचे जणू व्यसनच लागले आहे. सोशल मीडियाच्या वापराने जगाशी कनेक्ट होता येते, मात्र त्याचा अतिवापर टाळण्याची गरज आहे. सोशल मीडियावर आलेल्या माहितीची सत्यता पडताळून जर ती शेअर केली तरच लोकांना चांगली आणि योग्य माहिती मिळू शकते.

अशी घ्या काळजी

- सोशल मीडियाचा वापर करताना प्रायव्हसी सेटिंग योग्यप्रकारे सेट करून नंतरच आपले फोटो किंवा मेसेज शेअर केले पाहिजेत.

- एखाद्या व्यक्तीला ब्लॉक करण्याचा पर्याय फेसबुक, व्हॉट्सॲपवर उपलब्ध आहे.

- एखादी पोस्ट नको असल्यास ती काढून टाकली जाऊ शकते.

- मेसेज शेअर किंवा लाईक करताना आपण काही चुकीचे पाठवत नाही ना, याची काळजी घेणे गरजेचे आहे.

अनोळखी व्यक्तींना आपली माहिती देऊ नका. तसेच सोशल मीडियाचा वापर करताना काळजी घेणे गरजेचे आहे. आक्षेपार्ह मजकूर, पोस्टला लाईक, शेअर किंवा फॉरवर्ड करू नये. सध्या सण, उत्सव सुरू असून, सायबर विभाग सोशल मीडियावर लक्ष ठेवून आहे. आक्षेपार्ह मजूकर, फोटो सोशल मीडियावर शेअर, लाईक, फॉरवर्ड केल्याचे आढळून आल्यास कारवाई केली जाईल.

- भाग्यश्री कांबळे, पोलीस उपनिरीक्षक तथा सायबर कक्षप्रमुख

...तर होऊ शकते शिक्षा

सोशल मीडियावर धार्मिक भावना दुखावतील, अशा पोस्ट शेअर केल्यास अथवा लाईक, फॉरवर्ड केल्याचे सिद्ध झाल्यास कमीत कमी ३ वर्ष शिक्षा व ५ लाखांपर्यंत दंड होऊ शकतो. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर करताना सर्वांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन सायबर विभागाने केले आहे.