शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सेनगाव गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 23:35 IST

या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. येथील बोगस विद्यार्थी प्रकरणी सेनगाव येथील गट शिक्षणाधिका-यांच्या निलंबनाचा प्रस्ताव जि. प. प्रशासनाकडे पाठविण्यात आला आहे.

ठळक मुद्देकापडसिनगी येथील दोन विद्यालयांत दहावी परीक्षेसाठी अचानक विद्यार्थी संख्येत वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : सेनगाव तालुक्यातील कापडसिनगी येथील दोन विद्यालयांतील बोगस विद्यार्थी प्रकरणाचा तपास सुरू आहे. दहावी परीक्षेत नियमबाह्य विद्यार्थी बसवून शासनाची दिशाभूल केल्यााने नऊ जणांवर गुन्हाही दाखल आहे. आता या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. येथील बोगस विद्यार्थी प्रकरणी सेनगाव येथील गट शिक्षणाधिका-यांच्या निलंबनाचा प्रस्ताव जि. प. प्रशासनाकडे पाठविण्यात आला आहे.अतिरिक्त प्रवेशातून शिक्षणाचा खेळखंडोबा मांडणा-या दोषींवर गुन्हे दाखल करण्यात आले. आणि बोगस विद्यार्थी प्रकरणाचा पोलिस प्रशासनाकडून शोध सुरू आहे. कापडसिनगी येथील संत रेखेबाबा माध्यमिक व संत गजानन महाराज माध्यमिक विधालयातील दहावी परीक्षेती ६०० बोगस विद्यार्थी प्रकरण चांगलेच गाजले. आता सेनगाव येथील गटशिक्षणाधिकारी एस. एस. जगताप यांच्या निलंबनाचा प्रस्ताव औरंगाबाद विभागीय परीक्षा मंडळाच्या आदेशानुसार माध्यमिक शिक्षण विभागाने जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठविला आहे. परंतु मंडळाने एकाचाच निलंबनाचा प्रस्ताव का पाठविला असावा, इतरांवरही कार्यवाही कधी होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शिक्षणाचा बाजार मांडणा-या या प्रकरणाचा तपास सेनगाव पोलिसांकडून स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.स्थागुशाच्या पोनि जगदीश भंडरवार यांनी दोन्ही महाविद्यालयांच्या अधिक माहितीसंबधी माध्यमिक शिक्षणाधिकाºयांना पत्रही दिले होते. सध्या स्थागुशाकडून तपास सुरू असून अनेक धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. लवकरच पुढील कारवाई केली जाईल असे तपास पथकाने सांगितले. विशेष म्हणजे या प्रकरणामुळेच सेनगाव जि.प. शाळा दहावीचा निकालही घसरला आहे.---बोगस विद्यार्थी प्रकरणातील आरोपीस अटककापडसिनगी येथील दोन विद्यालयांतील बोगस विद्यार्थी प्रकरणातील एका आरोपीस स्थागुशाच्या पथकाने परभणी येथून १५ जून रोजी अटक केली आहे. आरोपीचे नाव दत्ता मते असून तो खाजगी क्लासेसचालकांना विद्यार्थी पुरवितो, या आरोपीस अटक करण्यात आली असून २० जून पर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली. अशी माहिती स्थागुशाचे पोनि जगदीश भंडरवार यांनी लोकमतशी बोलताना दिली. या प्रकरणाचा तपास सुरू असून लवकरच इतर आरोपींनाही अटक केली जाईल, असे भंडरवार यांनी सांगितले.

टॅग्स :Hingoliहिंगोलीeducationशैक्षणिक