शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

महावितरण कार्यालयास सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 00:15 IST

गत वीस वर्षांपासून थकीत असलेल्या मालमत्ता कराच्या रकमेची अदायगी न केल्यामुळे शुक्रवारी दुपारी २ वाजता न.पं.ने महावितरण कार्यालयास सील ठोकले. ऐन उन्हाळ्यात शहरासह ५२ गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाल्याने शहरवासियांची चांगलीच फजिती होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ: गत वीस वर्षांपासून थकीत असलेल्या मालमत्ता कराच्या रकमेची अदायगी न केल्यामुळे शुक्रवारी दुपारी २ वाजता न.पं.ने महावितरण कार्यालयास सील ठोकले. ऐन उन्हाळ्यात शहरासह ५२ गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाल्याने शहरवासियांची चांगलीच फजिती होत आहे.औंढा नागनाथ येथील महावितरण कार्यालयाकडे नगर पंचायतीचा अनेक वर्षांपासून २२ लक्ष ८४ हजार रुपये मालमत्ता कर थकीत आहे. गत वीस वर्षांपासून अनेकवेळा कर भरण्याबाबत नोटिसा दिल्या. मात्र हे कार्यालय दाद देत नसल्यामुळे मागच्या आठवड्यात वसुलीसाठी लोकअदालतमध्ये प्रकरण ठेवले होते; परंतु कराची रक्कम जास्त आकारल्याचे कारण पुढे करीत महावितरणने कर भरणा करण्यास नकार दिला. त्यामुळे येथील नगर पंचायत कार्यालयाचे कर निरीक्षक उत्तम जाधव, प्रकाश तोटालू, विजय महामुने, हरिहर गवळी, नंदकिशोर डाखोरे, मारोती पांढरे, विष्णू रणखांबे, नागेश बुरकुले, अनिल नागरे आदींनी दुपारी २ च्या सुमारास महावितरण कार्यालयास सील ठोकले. मालमत्ता कराची रक्कम प्राप्त होईपर्यंत सील काढण्यात येणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. महावितरण कंपनीच्या उपकेंद्र व आॅपरेटर रुमलाच सील ठोकल्याने या ठिकाणी अगोदर विद्युत पुरवठा बंद केला. याच ठिकाणाहून औंढा शहर व तालुक्यातील ५२ गावांमध्ये विद्युत पुरवठा केला जातो. सील केल्यामुळे दुपारपासून विद्युत पुरवठा बंद आहे. ऐन उन्हाळ्यात ही कारवाई करण्यात आली. मार्चएण्डच्या नावाखाली दोन्ही कार्यालयाच्या वसुलीच्या नादात नागरिकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली आहे.महावितरणचे उपअभियंता जैन यांना याबाबत संपर्क केला असता आमच्या रेकॉर्डनुसार ४ ते ५ लाखांची थकबाकी आहे. नगरपंचयतीने केलेल्या मागणीप्रमाणे कर भरण्यास असमर्थ असल्याची प्रतिक्रिया दिली. उन्हाळ्यात करण्यात आलेल्या या कारवाईमुळे औंढा शहरवासियांना धारेवर धारल्याचे बोलले जात आहे.नगरपंचायतीने महावितरणच्या कार्यालय व पॉवर स्टेशनला सील ठोकल्याने शहरासह ५२ गावांचा विद्युत पुरवठा खंडित केला होता. त्यामुळे शहरातील जनता उन्हामुळे त्रस्त झाली होती. करामुळे जनतेला वेठीस धरणे योग्य नसल्याने नगरपंचायत व महावितरण यांच्यात सायंकाळी ७ वाजता निर्णय झाला. कराची किती थकबाकी महावितरणकडे शिल्लक आहे, यावर शनिवारी तोडगा काढण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष सविता सतीश चौंढेकर यांनी दिली आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणHingoliहिंगोली