शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शाळेची जीर्ण इमारत बनली धोकादायक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 23:33 IST

शहरपासून ३ किमी अंतरावर असलेल्या बेलवाडी येथील जिल्हा परिषद शाळेची जीर्ण इमारत धोकादायक बनली आहे. इमारत दुरुस्तीसाठी, शाळा व्यवस्थापन समितीने प्रस्ताव दिल्यानंतरही शिक्षण विभाग याकडे मात्र दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरपासून ३ किमी अंतरावर असलेल्या बेलवाडी येथील जिल्हा परिषद शाळेची जीर्ण इमारत धोकादायक बनली आहे. इमारत दुरुस्तीसाठी, शाळा व्यवस्थापन समितीने प्रस्ताव दिल्यानंतरही शिक्षण विभाग याकडे मात्र दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे.बेलवाडी या गावात एक ते चार वर्गापर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेत सुमारे ६० च्यावर विद्यार्थी शिक्षण घेतात. येथे शिकविणीसाठी दोन शिक्षक आहेत. शाळेसाठी वीस वर्षांपूर्वी ३ खोल्या बांधण्यात आल्या होत्या. एका खोलीचे नंतर बांधकाम करण्यासत आले होते. सुरुवातीला बांधलेल्या तीन खोल्यांची अवस्था दयनीय आहे. तसेच विद्यार्थी - विद्यार्थिनींसाठी बांधण्यात आलेले स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली असून पडझड झाली आहे. शाळेवरील तिन्ही खोल्यांवरील टीनपत्रे खिळखिळे झाले असून भिंतींनाही मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे शाळेची इमारत कधी कोसळेल, याचा नेम नाही.शाळेची इमारत धोकादायक बनल्याने विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून ज्ञानार्जन करावे लागत आहे. त्यामुळे एखादी दुर्दैवी घटना घडू नये याकरिता शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भारत मांडगे यांनी दुरुस्तीसाठी शिक्षण विभागाकडे प्रस्ताव सादर केला. परंतु याबाबत दखल घेण्यात आली नाही.शिवाय शाळा व्यवस्थापन समितीने पाठवलेल्या प्रस्तावावर विचार करण्यात आला नाही. परंतु शाळेची इमारत अत्यंत जीर्ण झाल्याने जिल्हा परिषद प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांतून केली जात आहे.मागील अनेक वर्षांपासून येथील शाळेच्या इमारतीचा प्रश्न मार्गी लागत नसल्यामुळे ग्रामस्थांतून संताप व्यक्त केला जात आहे. बेलवाडी येथील शाळेच्या इमारतीकडे शिक्षण विभागाने लक्ष देऊन बांधकामाच्या प्रस्तावाची दखल घेण्यात यावी, व येथील शाळेच्या इमारतीचा प्रश्न मार्गी लावण्यात यावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांतून आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीSchoolशाळा