शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

बरडा पिंप्रीची शाळा भरली जि.प.च्या प्रांगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 00:33 IST

सेनगाव तालुक्यातील बरडा पिंपरी येथील दोन शिक्षकांची बदली झाल्याने गावातील पालकांनी थेट हिंगोली गाठून जिल्हा परिषदेच्या प्रांगणातच विद्यार्थ्यांची शाळा भरविल्याची घटना २६ नोव्हेंबर रोजी घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : सेनगाव तालुक्यातील बरडा पिंपरी येथील दोन शिक्षकांची बदली झाल्याने गावातील पालकांनी थेट हिंगोली गाठून जिल्हा परिषदेच्या प्रांगणातच विद्यार्थ्यांची शाळा भरविल्याची घटना २६ नोव्हेंबर रोजी घडली. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.सेनगाव तालुक्यातील बरडा पिंप्री या गावात जिल्हा परिषदेची एक ते पाचपर्यंत वर्गशाळा आहे. जवळपास १०० च्या वर विद्यार्थी या शाळेत शिकतात. येथे तीन शिक्षक कार्यरत होते. यातील दोन शिक्षकांची बदली झाली आहे. त्यामुळे बरडा पिंप्री येथील शाळेत तात्काळ शिक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी संतप्त झालेल्या ग्रामस्थांच्यावतीने करण्यात येत आहे. याबाबत शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी तसेच गावातील पालक वर्ग उपस्थित होते. जोपर्यंत शिक्षक नियुक्त होत नाहीत, तोपर्यंत शाळेत एकही विद्यार्थी पाठविण्यात येणार नाही. असा पावित्रा गावकºयांनी घेतला होता. एक शिक्षक संपूर्ण विद्यार्थ्यांना कसे काय शिकविणार? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यामुळे जि. प. परिसरात काहीवेळ तणावाचे चित्र होते. शिक्षणाधिकारी सोनटक्के यांनी गावकºयांशी चर्चा केली. तसेच रिक्त जागा प्रक्रियेनुसार भरण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. तर काही पालकांनी परीक्षा काळातच शिक्षकांची बदली झाल्याने रिक्त जागा लवकरात लवकर भरण्याची मागणी केली. तर उपोषणाचा इशाराही दिला. निवेदनावर उद्धव सानप, पंजाब वराड, जनार्दन सानप, अशोक मुंढे, गजानन सानप, सुरेश वाकळे, माधव सानप यांच्यासह गावकºयांच्या स्वाक्षºया आहेत.

टॅग्स :Hingoli z pहिंगोली जिल्हा परिषदSchoolशाळा