शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
5
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
6
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
7
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
8
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
9
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
10
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
11
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
12
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
13
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
14
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
15
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
16
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
17
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
18
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
19
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
20
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी

सातव यांच्या अटकेचे हिंगोलीत पडसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 23:44 IST

काँग्रेस उमेदवाराच्या भावाला झालेल्या मारहाणीचा निषेध करण्यासाठी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्या घरासमोर राजकोट येथे निदर्शने करताना काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी मारहाण व अटक केली. यामध्ये खा. राजीव सातव यांचा समावेश आहे. याचे हिंगोली जिल्ह्यात पडसाद पडले असून भाजपा कार्यालयाची तोडफोड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन तर बस तोडफोडीच्या घटना घडल्या.

ठळक मुद्देगुजरातमधील घटनेचे पडसाद : हिंगोलीत राजकीय धूमश्चक्री, भाजप, काँग्रेसच्या कार्यालयांची तोडफोड

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : काँग्रेस उमेदवाराच्या भावाला झालेल्या मारहाणीचा निषेध करण्यासाठी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्या घरासमोर राजकोट येथे निदर्शने करताना काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी मारहाण व अटक केली. यामध्ये खा. राजीव सातव यांचा समावेश आहे. याचे हिंगोली जिल्ह्यात पडसाद पडले असून भाजपा कार्यालयाची तोडफोड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन तर बस तोडफोडीच्या घटना घडल्या.सदर घटनेमुळे जिल्हाभरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. हिंगोली शहरातील गांधी चौक येथे काँग्रेस पक्षातर्फे गुजरात येथे खा. राजीव सातव यांच्यावरील हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी श्यामराव जगताप, डॉ. रवि पाटील, केशव नाईक, बापूराव बांगर, संजय राठोड, विशाल घुगे, श्रीराम जाधव, विश्वनाथ मांडगे, विश्वास बांगर, ज्ञानेश्वर जाधव, जुबरे मामू, निहाल भैय्या, नामदेव नागरे, दत्ता भवरे, आरेफ लाला, ज्ञानबा जगताप, दत्ता भवरे, बालाजी पारेसकर, माबूद बागवान, पांडुरंग बांगर, चांदू लांडगे, मोहसिन भाई, हाजी शे. एजास आदींनी सहभाग घेतला.कळमनुरी येथे निषेधखा. राजीव सातव यांना गुजरात येथे मारहाण केल्याच्या निषेधार्थ येथील नवीन बसस्थानकाजवळ आ.डॉ. संतोष टारफे यांच्या नेतृत्वाखाली गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्या पुतळ्याचे दहन केले. यावेळी आ.डॉ. संतोष टारफे, डॉ. सतीश पाचपुते, नंदकिशोर तोष्णीवाल, अ‍ॅड. अझहरोद्दीन कादरी, हमीदुल्ला पठाण, सादेक नाईक, निहाल कुरेशी, अ‍ॅड. इलियास नाईक, आयुब पठाण, उमर फारुक शेख, वाजीद पठाण, आजम बागवान, फारुक बागवान, समशेरखान महेसन चाऊस, बबलू पठाण, डॉ. नीलेश सोमाणी, नारायण शिंदे आदी उपस्थित होते.काँग्रेसचा पुतळा जाळला-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रतिकात्मक पुतळा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जाळला. त्यामुळे भाजपाच्या वतीने रविवारी काँग्रेसच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहण नवीन बसस्थानकाजवळ केले. यावेळी माजी खा. शिवाजी माने, संजय कावडे, अशोक संगेकर, अशोक पवार, भागवत ठाकुर, बी.डी. देशमुख, शेख मकबुल, शेख आयुब, अमोल दीपके, दामुअण्णा शिंदे, सोनबा बुर्से, कुणाल खर्जुले, एहसान सिद्दीकी, म. साजीद, अमिष दरक, बबलू कुबडे, अशोक वानखेडे, अलीम बागवान, मुस्तहीद नाईक उपस्थित होते.वसमत येथे निषेधखा. राजीव सातव यांना गुजरात पोलिसांकडून झालेल्या मारहाणीचा वसमत येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला. गुजरात सरकारचा प्रतिकात्मक पुतळा तयार करून त्यास जोडे मारले. वसमत येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोर्चाद्वारे झेंडा चौकात येवून निषेध नोंदवला. यावेळी जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, प्रदेश सचिव, अ. हफीज अ. रहेमान, सरपंच राजाराम खराटे, सीमा हफीज, प्रीती जैस्वाल, शेख अलीमोद्दीन, डॉ. एम.आर. क्यातमवार, शंकरराव कºहाळे, रविकुमार वाघमारे, नदीम सौदागर, अविनाश गायकवाड, युवराज आवटे, हारुण दालवाले, अमान पठाण, राजकुमार पटाईत, नगरसेवक खालेद शाकेर, आदी कॉग्रेस कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.कुरूंदा येथे निषेधहिंगोली लोकसभेचे खा. राजीव सातव यांना गुजरात राज्यात राजकोटमध्ये मारहाण झाली असून त्यांना पोलिसांनी अटक करून जामिनावर सुटका केली आहे. या घटनेचा कुरूंद्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जाहीर निषेध व्यक्त केला आहे. निषेधाचे निवेदन कुरूंदा पोलीस ठाण्यात सपोनि शंकर वाघमोडे यांना देण्यात आले आहे. यावेळी साईनाथ कुरूंदकर, ऐहसान जहागीरदार, मारोती मुळे, नागेश गुमटे, करीम बागवान, यांच्यासह इतर कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत निषेध निवेदन दिले.बाळापुरात बसवर दगडफेकखा. राजीव सातव यांना गुजरात येथे झालेल्या मारहाण व अटक प्रकरणी बाळापूर परिसरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. जुने बसस्थानकावर टायर जाळून रास्तारोको करण्याचा प्रयत्न झाला तर नवीन बसस्थानकावर बसवर दगडफेक झाली. आखाडा बाळापुरात दुपारी २. १५ वाजण्याच्या सुमारास जुन्या बसस्थानकवर खा. राजीव सातव समर्थकांनी राष्टÑीय महामार्गावर वाहतूक बंद करत खा. सातव यांच्या अटकेचा निषेध नोंदविला. यावेळी रस्त्यावर टायर जाळून गुजरात सरकारचा व भाजपच्या निषेधाचे नारे दिले. पो.नि. व्यंकट केंद्रे, फौजदार सदानंद मेंडके, शेख हाकीम, बाबर पठाण, अर्शद पठाण, प्रशांत सूर्यवंशी, सतीष तावडे, मडावी सह पोलीस कर्मचाºयांनी हस्तक्षेप करून आंदोलकांना काढून देत रस्ता वाहतूक सुरळीत केली. यावेळी नवीन बसस्थानकात औसा- अकोला एस.टी.वर सहा ते आठ जणांनी दगडफेक करीत निषेधाच्या घोषणा दिल्या. बसमधील प्रवाशांना खाली उतरवून दगडफेक केल्याने कोणास दुखापत झाली नाही. एम.एच. २० बी.एल. २०३४ बसचा क्रमांक आहे.या प्रकरणी बसचालक पुजारी, वाहक चंद्रकांत कुंभार, नियंत्रक शमीम पठाण यांनी बाळापूर ठाण्यात तक्रार दिली. चालक प्रविण निळकंठ पुजारी यांच्या फिर्यादीवरून आठ ते नऊ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. बसवर दगडफेक केल्याने चालक पुजारी यांच्या फिर्यादीवरून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यांचे पुत्र दत्ता बोंढारे, प्रविण बयास, लक्ष्मण बोंढारे व इतर पाच ते सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.