शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

३० हजारांची लाच घेताना सरपंचास पकडले

By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Updated: October 4, 2022 20:48 IST

पोल्ट्री फार्म टाकण्यासाठी लागणाऱ्या एनओसीसाठी सरपंचास पथकाने ताब्यात घेतल्यानंतर यात ग्रामसेवकाचाही सहभाग असल्याचा संशय पथकाला आहे.

हिंगोली : पोल्ट्री फार्म टाकण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी ३० हजारांची लाच स्वीकारताना सरपंचाला हिंगोलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथे ४ ऑक्टोबर रोजी दुपारी करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड येथील एकास वारंगा फाटा शिवारामध्ये पोल्ट्री फार्म उभारायचे होते. यासाठी ग्रामपंचायतीच्या नाहरकत प्रमाणपत्राची आवश्यकता होती. त्यामुळे वारंगा फाटा येथील ग्रामपंचायतीशी संपर्क साधून त्यांनी नाहरकत प्रमाणपत्राची मागणी केली. मात्र, नाहरकत प्रमाणपत्रासाठी ३० हजारांच्या लाचेची मागणी सरपंच ओम कदम यांनी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने हिंगोलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यावरून तक्रारीची शहानिशा करण्यात आली. यात लाच मागितल्याचे दिसून आल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक नीलेश सुरडकर, पोलीस निरीक्षक प्रफुल्ल अंकुशकर, विजय पवार यांच्या पथकाने ४ ऑक्टोबर रोजी वारंगा फाटा येथे सापळा रचला.

यावेळी सरपंच ओम कदम ३० हजारांची लाच घेताना पथकाच्या जाळ्यात सापडले. याप्रकरणी पथकाकडून घराची तपासणी सुरू असून, सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा नोंद झाला नव्हता. या पथकात सहायक पोलीस उपनिरीक्षक सय्यद युनूस, जमादार विजय उपरे, तान्हाजी मुंडे, राजाराम फुफाटे, ज्ञानेश्वर पंचलिंगे, योगीता अवचार आदींचा समावेश होता.

ग्रामसेवकाचाही सहभाग असल्याचा संशयदरम्यान, पोल्ट्री फार्म टाकण्यासाठी लागणाऱ्या एनओसीसाठी सरपंचास पथकाने ताब्यात घेतल्यानंतर यात ग्रामसेवकाचाही सहभाग असल्याचा संशय पथकाला आहे. त्यानुसार सरपंच, ग्रामसेवकाच्या मोबाइल व्हॉइस रेकाॅर्डची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर ओम कदम हे उपसरपंच असून, मागील वर्ष-दीड वर्षापासून आदिवासी महिलेने राजीनामा दिल्याने सरपंचपद रिक्त आहे. मध्यंतरी सदस्यांतून सरपंच निवडीचा प्रयत्न झाला. मात्र, तो निष्फळ ठरल्याने कदम हेच सरपंचपद सांभाळत आहेत.