शहरं
Join us  
Trending Stories
1
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
2
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
3
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
4
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
5
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
6
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
7
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
8
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
9
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
10
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
11
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
12
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
13
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
14
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
15
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
16
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
17
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
18
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
19
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
20
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली

संक्रातीनंतर करीसाठी भाविक सारंग स्वामींच्या यात्रेत; १६० क्विंटल भाजीच्या प्रसादाचे वाटप

By यशवंत भीमराव परांडकर | Updated: January 17, 2024 15:14 IST

यात्रेतील प्रसादाची भाजी घेण्यासाठी काही भाविक मुक्कामी; सकाळी नऊ वाजेपासून सारंगवाडीत प्रसाद वाटप सुरू

- महेबूबखाँ पठाणशिरडशहापूर (जि. हिंगोली): औंढा तालुक्यातील सारंगवाडी येथील सारंग स्वामी महाराजांच्या यात्रेत बुधवारी एकत्र केलेल्या विविध भाजींचा प्रसाद भाविकांना वाटप करण्यात आला. गावोगावच्या भाविकांनी भाजी यात्रा महोत्सवात सहभाग घेत सारंग स्वामी महाराजा यांच्या संजिवन समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

भाजी यात्रा महोत्सवानिमित्ताने सारंगवाडी येथील देवस्थानच्या वतीने १0 जानेवारीपासून अखंड शिवनाम सप्ताह परमरहस्य ग्रंथराज पारायण सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्याची सांगता १७ जानेवारी रोजी करण्यात येऊन भाजी प्रसाद भाविकांना वाटप करण्यात आला. या भाजी महोत्सवात हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, बीड, उस्मानाबाद, अकोला आदी जिल्हे तसेच कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी राज्यांतील भाविकांनी सहभाग घेत भाजी प्रसादाचा लाभ घेतला. १६ जानेवारी रोजी काही भाविकांनी सारंगवाडी येथील देवस्थान परिसरात मुक्काम ठोकला होता. जवळपास १६० क्विंटल भाजीचा प्रसाद तयार करण्यासाठी मोठमोठ्या कढयांचा वापर करण्यात आला. औंढा तालुक्यातील शिरड शहापूर परिसरातील सारंग स्वामी मठ संस्थानची यात्रा भाजीसाठी प्रसिद्ध आहे. प्राचीन काळापासून हा सोहळा मकर संक्रांतीच्या करीच्या दुसऱ्या दिवशी साजरा करण्यात येत असतो.

सकाळी नऊ वाजता भाजी प्रसाद वाटप सुरु...१६ जानेवारी रोजी रात्री भाज्या घेऊन अनेक भाविक दाखल झाले होते. रात्रीपासून भाजी प्रसाद तयार करण्यासाठी सुरुवात करण्यात आली होती. १७ जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता भाजी प्रसाद वाटप करण्यास सुरुवात करण्यात आली. भाजीचा प्रसाद भाविकांना व्यवस्थितरित्या मिळावा म्हणून मंदिर व्यवस्थापन समितीने ठिकठिकाणी व्यवस्था केली होती. प्रत्येक भाविकाला भाजीचा प्रसाद मिळावा म्हणून स्वयंसेवक उभे करण्यात आले होते.

सर्व भाज्या केल्या एकत्र...या भाजी महोत्सवात अनेक भाज्या एकत्र करुन त्याचा प्रसाद भाविकांना वाटप करण्यात आला. यामध्ये वांगे, फूलकोबी, आलू, दोडके, कारले, मेथी, कोथिंबीर, काकडी, चवळी, गवार, भेंडी आदी विविध भाज्या एकत्र करुन त्या शिजविण्यात आल्या होत्या.

टॅग्स :Hingoliहिंगोलीspiritualअध्यात्मिक