शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या नोटा बंद होणार असल्याची अफवाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:54 IST

हिंगोली: जुन्या शंभर, दहा व पाच रूपयांच्या नोटा बंद होणार असल्याचे संकेत रिझर्व्ह बँकेने दिल्याचे वृत्त प्रसारित होत ...

हिंगोली: जुन्या शंभर, दहा व पाच रूपयांच्या नोटा बंद होणार असल्याचे संकेत रिझर्व्ह बँकेने दिल्याचे वृत्त प्रसारित होत आहे. मात्र यासंदर्भात बँकांना कुठल्याही सूचना मिळाल्या नसून नागरिकही बिनधास्त असल्याचे चित्र हिंगोली जिल्हाभरात पहावयास मिळत आहे. जुन्या नोटा बंद झाल्या तरी नवीन नोटा बदलून मिळतीलच की असे नागरिकांतून बोलले जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीचा निर्णय घेतल्यानंतर विरोधकांकडून टिकेची झोड उठली होती. आता पुन्हा जुन्या शंभर, दहा व पाच रूपयांच्या नोटा बंद करण्याचे संकेत रिझर्व्ह बँकेने दिल्याचे बातम्या प्रसारित झाल्या आहेत. मार्च किंवा एप्रिल महिण्यापर्यंत शंभर, दहा, पाच रूपयांच्या नोटा बंद होतील अशी चर्चाही नागरिकांतून होत आहे. मात्र यासंदर्भात बँकांना कुठल्याही सूचना मिळाल्या नसल्याचे अनेक बँकांचे म्हणणे आहे. त्यामुळे सध्या तरी जुन्या नोटा बंद होण्याच्या चर्चेला विराम बसला आहे. जुन्या नोटा बंद होण्याची अफवा नागरिकांपर्यंत पोहचली असली तरी बाजारपेठेतील सर्वच व्यवहार सुरळीत आहेत. तसेच व्यापाऱ्यांतूनही जुन्या नोटा स्विकारल्या जात होत्या. तसेच जुन्या नोटा जमा करण्यासाठी कोणत्याही बँकात गर्दी होताना दिसून येत नव्हती. २५ जानेवारी रोजी शहरातील सर्वच बँकांत नियमित व्यवहार सुरू असल्याचे दिसून आले.

बँकांना कोणत्याही सूचना नाहीत

जुन्या शंभर, दहा, पाच रूपयांच्या नोटा बंद होण्यासंदर्भात कोणत्याही सूचना बँकाना मिळाल्या नाहीत. बँकातही सर्व व्यवहार नियमितपणे सुरू होेते. बँक शाखा अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता जुन्या नोटा बंद झाल्यासंदर्भात कोणत्याही सूचना अथवा पत्र मिळाले नसल्याचे सांगितले.

जुन्या नोटा बंद झाल्याबाबत काही चर्चा नाही. जुन्या नोटा घेणार नसल्याचे अद्याप एकाही ग्राहकांनी म्हटले नाही. जुन्या नोटांची देवाण-घेवाण सुरू आहे.

राजेश जैस्वाल, व्यापारी हिंगोली

नोटा बदलाची अफवा पसरत आहे. मात्र आमच्याकडे जुन्या नोटा घेणार नाही, असे म्हणणारे ग्राहक आले नाहीत. आम्हीही जुन्या नोटा स्विकारत असून जुन्या शंभर, दहा, पाच रूपयांचे व्यवहार सुरळीत चालू आहेत.

-अनिल नेणवाणी,व्यापारी हिंगोली

पाच, दहा, शंभराच्या जुन्या नोटा बंद होणार असल्याची अफवा बातम्यांतून ऐकिवात आहे. ग्रामीण भागात अद्याप जुन्या नोटा बंद होणार असल्याच्या संदर्भात चर्चा नाही. जरी नोटा बंद झाल्या तरी नवीन नोटा बदलून मिळतील आखाडा बाळापुरातील व्यापारी जुन्या नोटा स्विकारत असून देवाण-घेवाण सुरू आहे.

-व्यंकटेश तेलावार, अध्यक्ष, किराणा असो. आ. बाळापूर