शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : इंग्रजीला पालख्या आणि हिंदीला विरोध? हे कसं चालतं ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सवाल
2
चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ मोठी जलवाहिनी फुटली; 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा बंद!
3
मोठी बातमी: संग्राम थोपटे यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा; लवकरच भाजपमध्ये करणार प्रवेश
4
चीनकडून येणारा निकृष्ट दर्जाचा माल रोखण्याचा डाव भारतावरच उलटला! कोणाची समस्या वाढली?
5
आता इलॉन मस्क जगात वाटताहेत शुक्राणू, महिलांशी संपर्क, मुलांची ‘फौज’ तयार करणार
6
"माझ्या नावाचं मंदिर, तिथे लोक पूजा करतात"; उर्वशी रौतेलाचा मोठा दावा, पुजाऱ्याने सगळी स्टोरी सांगितली
7
फळं खावीत की ज्यूस प्यावा... आरोग्यासाठी काय फायदेशीर? डाएटीशियनने दूर केलं कन्फ्यूजन
8
JEE Main Result 2025: महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! जेईई परीक्षेत राज्यातील तिघांना १०० टक्के गुण
9
तनिषा भिसेंना न्याय मिळणार का? चौकशी अहवालांच्या खेळात गांभीर्य हरवले, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष
10
"गारगाई धरणाला विरोध केल्यास तीव्र आंदोलन करू", आमदार भातखळकरांचा ठाकरेंना इशारा
11
मराठी भाषेचं नुकसान आम्ही सहन करणार नाही; हिंदी भाषेची सक्ती, सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारला इशारा
12
"हे बघ, तुझा मुलगा मेला"; डोक्यात खिळा ठोकून चिमुकल्याची निर्घृण हत्या, आईला दिला मृतदेह
13
आयपीएलदरम्यान बीसीसीआयने मुंबई टी२० लीग संघाच्या मालकावर घातली आजीवन बंदी, कारण काय?
14
पुण्यावरून चंद्रपूरकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला यवतमाळजवळ भीषण अपघात; ३० प्रवासी जखमी
15
बार्शीत एमडी ड्रग्जसह गावठी पिस्तूल जप्त,आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी; तुळजापूर कनेक्शन?
16
प्रेक्षक-समीक्षकांकडून कौतुक तरीही कमाई कमीच! 'केसरी २'चा पहिल्या दिवशीचा बॉक्स ऑफिस रिपोर्ट समोर
17
Video - भलताच छंद! 'ती' डास मारते, जपून ठेवते अन् त्याला खास नाव देते; ठेवलाय अजब रेकॉर्ड
18
First ATM: केवळ ११,२०० लोकसंख्येचा असा देश, जिथे एकही ATM नव्हतं; आता सुरु झालं पहिलं एटीएम
19
तिसऱ्या मुंबईच्या पायाभूत सुविधांसाठी कोरियाचा हातभार, कुठे असेल तिसरी मुंबई?
20
IPL- एक ‘डॉट बॉल’ पडला, की लागतील ५०० झाडे!

हिंगोलीच्या जिल्हा बँकेत राडा; शेतकरी-कर्मचाऱ्यांत फ्रीस्टाइल हाणामारीने उडाला गोंधळ

By रमेश वाबळे | Updated: April 15, 2025 16:57 IST

यात बँकेच्या एका कर्मचाऱ्याचे डोके फुटले आहे, तर अन्य एक कर्मचारी आणि दोघा शेतकऱ्यांनाही दुखापत झाली.

हिंगोली : येथील जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेत विड्राॅल देण्या- घेण्यावरून शेतकरी व बँक कर्मचाऱ्यांत फ्रीस्टाइल हाणामारी झाल्याची घटना १५ एप्रिल रोजी दुपारी १:३० वाजेच्या सुमारास घडली. यात बँकेच्या एका कर्मचाऱ्याचे डोके फुटले आहे, तर अन्य एक कर्मचारी आणि दोघा शेतकऱ्यांनाही दुखापत झाली. या घटनेमुळे बँकेत काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता.

शहरातील जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेत शेतकऱ्यांच्या खात्यावर मागील आठवडाभरात प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, पीकविमा, दुष्काळी अनुदानाची रक्कम जमा झाली आहे. ही रक्कम काढण्यासाठी शाखेत शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. मागील तीन दिवसांच्या सुट्यानंतर १५ एप्रिल रोजी बँक सुरू झाली. त्यामुळे सकाळी ९ वाजेपासूनच शेतकऱ्यांनी बँक परिसरात गर्दी केली होती, तर ११ वाजेच्या सुमारास रांग लागली होती. यादरम्यान बँकेच्या वतीने ७०० शेतकऱ्यांना पैसे काढण्यासाठीच्या पावतीचे वाटप करण्यात आले. त्यानंतर क्रमानुसार शेतकऱ्यांना खात्यातील रक्कम वितरित केली जात होती.

दुपारी १:३० वाजेच्या सुमारास हिंगोली तालुक्यातील पारडा येथील शेतकरी संजय रघू वाघमारे व चांदू रघू वाघमारे यांनी बँक कर्मचारी शेख मुनीर यांच्याकडे पैसे काढण्यासाठीची विड्राॅल पावती मागितली; परंतु अगोदरच ७०० शेतकऱ्यांना विड्राॅल दिला असून, आता थांबावे लागेल आणि गर्दी होऊ नये यासाठी बँकेच्या बाहेर थांबण्याचे शेख मुनीर यांनी शेतकऱ्यांना सांगितले. यावरून शेतकरी व कर्मचाऱ्यात वाद उद्भवला आणि या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. कर्मचाऱ्यांनी बँकेच्या शाखेत आणि शाखेबाहेर आणूनही मारहाण केल्याचे शेतकरी संजय वाघमारे व चांदू वाघमारे यांनी सांगितले. तर दोघा शेतकऱ्यांनी बँकेचे कर्मचारी ओम काळे यांना दगड मारल्याने त्यांचे डोके फुटले, तसेच शेख मुनीर यांनाही मारहाण केल्याचे बँक प्रशासनाने सांगितले.

दरम्यान, हाणामारीच्या घटनेमुळे बँक शाखेत गोंधळ उडाल्याने ही माहिती शहर ठाण्यात देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत संजय वाघमारे व चांदू वाघमारे यांना पोलिस ठाण्यात नेले होते, तर जखमी ओम काळे यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा नोंद झाला नव्हता.

टॅग्स :HingoliहिंगोलीCrime Newsगुन्हेगारीbankबँक