शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

‘भारत जोडो’त कुस्तीसह कोल्हापुरी फेट्यांचा रुबाब

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2022 11:06 IST

Bharat Jodo Yatra: पट्टा लढत, लिंबू कापणे, डोक्यावर नारळ फोडणे, आदी मर्दानी खेळांतून, प्राचीन युद्धकलेच्या जिगरबाज प्रात्यक्षिकांनी कोल्हापूरकरांनी हिंगोलीत काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांचे जंगी स्वागत केले.

- आयुब मुल्ला हिंगोली : कोल्हापुरी फेट्यांचा रुबाब, हलगी-घुमक्याच्या ठेक्यावरील लेझीम आणि नेत्रदीपक कुस्ती, तलवारबाजी, लाठीकाठी, दांडपट्टा, भाला लढत, पट्टा लढत, लिंबू कापणे, डोक्यावर नारळ फोडणे, आदी मर्दानी खेळांतून, प्राचीन युद्धकलेच्या जिगरबाज प्रात्यक्षिकांनी कोल्हापूरकरांनी हिंगोलीत काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांचे जंगी स्वागत केले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या नियोजनबद्ध अनोख्या स्वागताने राहुल गांधी चांगलेच भारावून गेले. शनिवारी हिंगोलीत केवळ कोल्हापूर काँग्रेसचीच चर्चा राहिली.राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा शनिवारी हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथे आली. त्यांच्या स्वागतासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते पहाटे चारपासूनच रस्त्याच्या दुतर्फा एकत्र झाले होते. ‘कोल्हापुरी भगवे फेटे’ आणि भारत जोडो यात्रेचे टी-शर्ट परिधान करून सुमारे दहा हजार कार्यकर्त्यांमध्ये राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी उत्साह संचारला होता. आमदार सतेज पाटील, ऋतुराज पाटील, राजू आवळे, प्रा. जयंत आसगावकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, आदी कार्यकर्ते सुमारे दहा किलोमीटर यात्रेत सहभागी झाले होते. 

‘मुझे कुस्ती देखनी है...’बलदंड शरीरयष्टी असलेल्या मल्लांकडे राहुल गांधी कुतूहलाने पाहत होते. त्यांनी थेट आखाडा गाठला. राहुल यांना पाहताच मल्लांनी शड्डू ठोकल्याने परिसरात आवाज घुमला. हे सगळे पाहून ‘मुझे कुस्ती देखनी है’ असा आग्रह त्यांनी धरला आणि शाहू आखाड्याचे पैलवान उमेश चव्हाण व बंटीकुमार या तगड्या मल्लांची खडाखडी सुरू झाली. सतेज पाटील यांनी कोल्हापूरच्या कुस्ती खेळाची महती त्यांना सांगितली.यावेळी राहुल गांधी यांना कोल्हापुरी फेटा बांधून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा भेट देण्यात आला. शाहू महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करताना राहुल  यांनी पादत्राणे काढून सुसंस्कृतपणाचे दर्शन घडविले. 

 

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राRahul Gandhiराहुल गांधी