शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेचे आमदार निलेश राणेंची BJP प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांवर आगपाखड, संतापून म्हणाले...
2
Sushma Andhare : "प्रिय उदयभाऊ, उपमुख्यमंत्री पदाची तुमची सुप्त महत्वकांक्षा मी..."; सुषमा अंधारेंचा खोचक टोला
3
शेअर मार्केट, रियल इस्टेट क्रॅश येणार? रॉबर्ट कियोसाकींचा मोठा इशारा; 'या' क्षेत्रात गुंतवणुकीचा सल्ला
4
"अजित पवार उपमुख्यमंत्री; मुख्यमंत्री फडणवीस, त्यामुळे त्यांनाच मतदान करा", चंद्रकांत पाटलांचं विधान
5
पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू; कुटुंबीयांकडून हत्येचा गंभीर आरोप, वरळी पोलीस ठाण्यात आक्रोश
6
शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे सोन्याला पुन्हा भाव! मात्र, चांदी घसरली; आजचे दर काय?
7
Delhi Blast : दहशतवादी डॉक्टरांमध्ये मतभेद; आदिलच्या लग्नाला का गेला नाही उमर? दिल्ली स्फोटात मोठा खुलासा
8
IND vs SA : कोण आहे Senuran Muthusamy? कसोटी पदार्पणात 'विराट' विकेट; भारताशी खास कनेक्शन अन् बरंच काही
9
४०व्या वर्षी दुसऱ्या बाळाला जन्म देणार सोनम कपूर, हटके मॅटर्निटी फोटोशूटने वेधलं लक्ष
10
युद्धाचा भडका उडणार, अमेरिका 'या' देशात सत्तांतर घडवण्याच्या तयारीत?; विमाने रद्द, युद्धनौका, लढाऊ विमाने तैनात
11
कर्मचारीहिताचा मोठा निर्णय! 'गिग वर्कर्स'नाही मिळणार PF-ग्रॅच्युइटी; नवीन लेबर कोडचे ३ महत्त्वाचे फायदे!
12
टॉर्चर अन् चॅटिंगने १० महिन्यातच संपवला संसार; पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीच्या मृत्यू प्रकरणात गूढ वाढले
13
काळाचा घाला! नैनीतालमध्ये भीषण अपघात, खोल दरीत पडली कार; तिघांचा मृत्यू, १ जखमी
14
"लढाई करून जिंकण्याचा दम नाही म्हणूनच..."; दिल्ली स्फोटावरून लष्करप्रमुख द्विवेदींनी पाकिस्तानचे काढले वाभाडे
15
टीम इंडियावर वनडेत नवा कर्णधार शोधण्याची वेळ! कोण घेणार शुभमन गिलची जागा?
16
जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकांवर टांगती तलवार; सुप्रीम कोर्टात काय होईल? इच्छुकांची घालमेल
17
VIDEO: हरलेल्या संघाच्या कॅप्टनला विचारलं- "जिंकल्यावर कसं वाटतंय?"; चूक लक्षात येताच....
18
"तू आई-वडिलांना छोट्या गोष्टी..."; फिजिओथेरपिस्टचा होणाऱ्या नवऱ्याला मेसेज, का संपवलं आयुष्य?
19
५ डॉक्टरांनी २६ लाख जमवले; दिल्लीतील स्फोट फक्त ट्रेलर, अनेक शहरांत हल्ल्याची योजना, NIA चा खुलासा
20
आमदार आल्यानंतर उभे न राहिल्याने डॉक्टरवर कारवाई; हायकोर्टानं काढली सरकारची खरडपट्टी, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

कुशल निधीचे ४.६७ कोटी रुपये थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 00:18 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतील कुशल निधीची मागणी करूनही हा निधी दिला जात नसल्याने मागील सहा महिन्यांपासून लाभार्थी पंचायत समितीच्या चकरा मारून हैराण आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतील कुशल निधीची मागणी करूनही हा निधी दिला जात नसल्याने मागील सहा महिन्यांपासून लाभार्थी पंचायत समितीच्या चकरा मारून हैराण आहेत. यात काही ठिकाणी तर कामांवरही परिणाम होताना दिसत आहे. ग्रामपंचायतींनी अखर्चित रक्कम परत केली नसल्याने हा निधी थांबविल्याचे सांगितले जात आहे.हिंगोली जिल्ह्यात पाणंद रस्ते, शेततळे, क्रीडांगण, सिमेंट नाला बांध, सिंचन विहीर, विहीर पुनर्भरण, शौचालय, शोषखड्डे, रोपवाटिका, नाडेप कंपोस्ट आदी कामांसाठी मजुरीशिवाय साहित्यावरही खर्च करावा लागतो. यात काही कामे सार्वजनिक तर काही कामे वैयक्तिक लाभाची आहेत. सार्वजनिक कामांमध्ये ग्रामपंचायतींना कळ काढणे शक्य आहे. मात्र वैयक्तिक लाभाच्या योजनेतील लाभार्थी यात नाहक भरडले जात आहेत. यापूर्वी ग्रामपंचायतींना दिलेल्या रक्कमेपैकी अखर्चित रक्कम शासन खाती जमा केली जात नसल्याने सरसकट लाभार्थ्यांची कुशलची देयके अडकून धरली आहेत. त्याचा परिणाम म्हणून आता लाभार्थी नवीन कामे करायची की नाही? असा विचार करू लागली आहेत.यंदा मग्रारोहयोत शासनाने दिलेल्या उद्दिष्टाएवढी कामे जानेवारीतच पूर्ण झाली आहेत. मात्र कुशलची देयके तेवढी बाकी आहेत. अजूनही इतर कामांचा जोरदार धडाका सुरू आहे. त्यामुळे अशा कामांमध्ये साहित्यासाठी लागणाऱ्या खर्चाची रक्कम वाढतच चालली आहे. पंधरा दिवसांपूर्वीच ४.६७ कोटी रुपयांची कुशलची देयके अडकल्याचे दिसून येत होते.यामध्ये सर्वाधिक रक्कम हिंगोली तालुक्याची अडकली असून २.२४ कोटी रुपये थकलेले आहेत. त्यानंतर औंढा नागनाथ तालुक्यातून १.१८ कोटींची रक्कम थकल्याचे दिसून येत आहे. कळमनुरी तालुक्याचे ५८.३३ लाख, सेनगाव तालुक्याचे ३५.३२ लाख तर वसमत तालुक्यातील ३0.0९ लाख रुपये थकलेले आहेत. हिंगोली तालुक्यातील काही भागातून कुशलची रक्कम देण्याच्या मागणीसाठी तक्रारीही प्राप्त होत आहेत. दुष्काळी परिस्थितीत अशाप्रकारे रक्कम थकल्यास कामे बंद पडणार असून त्यामुळे मजुरांना पुन्हा स्थलांतर करावे लागेल, असा तक्रारींचा सूर दिसून येत आहे.कामनिहाय थकलेली ‘कुशल’ ची रक्कमपाणंद रस्ते- २.११ कोटीशेततळे-६.८४ लाखवै.क्रीडांगण-५६ हजारसिमेंट नाला बांध-६.७४ लाखसिंचन विहीर-२.२३ कोटीविहीर पुनर्भरण-१८ हजारशौचालय बांधकाम-२.८९ लाखशोषखड्डे-१.0२ लाखरोपवाटिका-१३.९७ लाखनोडपे कंपोस्ट-६२ हजारतुती लागवड-00

टॅग्स :government schemeसरकारी योजनाfundsनिधी