शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

जेथे शिक्षणाचे धडे गिरवले, तिच शाळा फोडली; पोलिसांनी दहा वर्षानंतर ठोकल्या बेड्या

By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Updated: July 30, 2023 19:47 IST

जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या विहिरीवरील व कॅनॉलरील विद्युत मोटारी चोरी जाण्याचे प्रमाण वाढले होते.

हिंगोली : जेथे शिक्षणाचे धडे गिरवले तीच शाळा फोडून मुद्देमाल लंपास करणाऱ्या चोरट्यांना तब्बल दहा वर्षानंतर पकडण्यात पोलिसांना यश आले. 'कानुन के हात बहुत लंबे होते है' ही म्हणही या निमित्ताने खरी ठरली आहे.

जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या विहिरीवरील व कॅनॉलरील विद्युत मोटारी चोरी जाण्याचे प्रमाण वाढले होते. त्या अनुषंगाने विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते. विद्युत मोटारी चोरी जाण्याच्या प्रकारामुळे शेतकऱ्यांमधून भिती व्यक्त केली जात होती. त्यामुळे चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे यांचे पथक चोरट्यांचा शोध घेत होते. आखाडा बाळापूर पोलिस ठाणे हद्दीत झालेल्या घटनांतील चोरटे हे कळमनुरी तालुक्यातील येहळेगाव तु. येथील असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्या नुसार पथकाने विक्रम उर्फ बंटी दत्तराव काळे, ज्ञानेश्वर भीमराव काळे, संकेत पुंजाराम कवाणे यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी फरार झालेले तिरूपती उर्फ बाळू किसन जाणकर, आकाश मेटकर, गजानन धोंडबाराव पतंगे यांच्यासह मिळून चार ठिकाणी विद्युत मोटारींची चोरी केल्याची कबुली दिली. पथकाने अधिक तपास केला असता दहा वर्षापूर्वी गावातील शाळा फोडून चोरी केल्याची कबुलीही दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून विद्युत मोटार व शाळेतील टीव्ही, दुचाकी असा एकूण ८० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. 

जेथे शिकले तेथेच मारला डल्लाजेथे शिक्षण घेतले त्याच शाळेत चोरी करून मुद्देमाल लंपास केला. ही घटना २०१३ मध्ये घडली होती. दहा वर्षाचा कालावधी झाल्याने पोलिस आपल्यापर्यंत पोहचणार नाहीत, अशी समज चोरट्यांना होती. मात्र 'कानून के हात लंबे होते है' या म्हणीप्रमाणे पोलिसांनी तब्बल दहा वर्षानंतर शाळेतील चोरीचा उलगडा केला. ही कार्यवाही पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलिस अंमलदार शेख बाबर, विठ्ठल कोळेकर, गणेश लेकुळे, आकाश टापरे, नरेंद्र साळवे, तुषार ठाकरे यांच्या पथकाने केली. 

भंगार दुकानदारासही केले आरोपीचोरटे हे विद्युत मोटार पंपची चोरी करून त्याची भंगार दुकानात विक्री करीत होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भंगार दुकानदाराला सुद्धा आरोपी केल्यामुळे चोरीची मोटार किंवा चोरीची मोटर सायकल घेणाऱ्या भंगार दुकानदाराचे धाबे दणाणले आहेत. कोणीही चोरीचे साहित्य खरेदी करू नये अन्यथा कायदेशीर कडक कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

टॅग्स :theftचोरी