शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

सेना-भाजपमध्ये बंडखोरी अटळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 23:33 IST

शिवसेना व भाजपची युती होणार की नाही, याचा अजूनही काही ताळमेळ नाही. मात्र जी मंडळी कामाला लागली त्यापैकी अनेकजण आता पक्षाने तिकिट नाही दिले तर अपक्ष रिंगणात राहण्याची भाषा करीत आहेत. युती नाही झाली तरीही कुणी रिंगणात राहते की काय, याची चिंता असताना न झाल्यास बंडखोरी अटळ दिसत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शिवसेना व भाजपची युती होणार की नाही, याचा अजूनही काही ताळमेळ नाही. मात्र जी मंडळी कामाला लागली त्यापैकी अनेकजण आता पक्षाने तिकिट नाही दिले तर अपक्ष रिंगणात राहण्याची भाषा करीत आहेत. युती नाही झाली तरीही कुणी रिंगणात राहते की काय, याची चिंता असताना न झाल्यास बंडखोरी अटळ दिसत आहे.मागील काही दिवसांपासून शिवसेना व भाजपमध्ये इनकमींग जोरात होते. त्यातही शिवसेनेत जुनेच कमी नव्हते म्हणून त्यांनी नव्यांना विधानसभेच्या दृष्टीने पक्षात घेण्याचे हिंगोली वगळता इतरत्र टाळलेच. मात्र भाजपला हिंगोली वगळता इतरत्र कोणताच चेहरा नसल्याने मागच्या विधानसभेपासून सुरू असलेले इनकमींग अजूनही सुरूच आहे. शिवसेना व भाजपमध्ये सर्वाधिक वादाची ठिणगी पडलेली आहे ती कळमनुरी व वसमत या सेनेच्या पारंपरिक मतदारसंघांमध्ये. हे दोन्ही मतदारसंघ सेनेकडून हिसकावण्यासाठी भाजपची साम, दाम, दंड, भेदची नीती दिसत आहे. मात्र कळमनुरीत त्यातही अडचण आहे. हा मतदारसंघ आम्हाला सोडा म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर अडून बसले आहेत. युती झाली अन् रासपला मतदारसंघ सुटला तर विनायक भिसे यांना उमेदवारी मिळते की ऐनवेळी उमेदवार आयात केला जातो, हा वेगळाच प्रश्न आहे. मात्र त्यानंतर सेनेचे संतोष बांगर, भाजपचे अ‍ॅड.शिवाजी माने, गजानन घुगे, डॉ.जयदीप देशमुख यांना लढल्याशिवाय चैन पडेल, असे दिसत नाही. युती नाही झाली तरीही भाजपऐवजी रासप आली तर हा प्रश्न पुन्हा भाजपीयांसमोर कायमच राहणार आहे. त्यामुळे हा मतदारसंघ किमान एक ते दोन बंडखोरांना जन्म घालण्याची चिन्हे आहेत.वसमतमलाही वेगळे चित्र नाही. युती झाली तर ही जागा अ‍ॅड. शिवाजी जाधव यांच्यासाठी भाजप सोडवून घेणार असल्याच्या वावड्या उठत आहेत. मग सेनेचे आ.जयप्रकाश मुंदडा गप्प बसणे शक्यच नाही. तर काहीजण जाधव यांचे सेनेचे खा.हेमंत पाटील यांच्याशी लोकसभेला सख्य वाढल्याने जाधवच सेनेचे उमेदवार असतील, असेही सांगू लागले आहेत. दुसरे म्हणजे पंचायत समितीच्या बांधकामाच्या निविदा उघडण्यास विरोधासाठी भाजपच्या मंडळींना मदत म्हणून खा.पाटील यांचेही पत्र होतेच. यामुळे आ.मुंदडा व खा.पाटील एका मंचावर बसून हसतमुखाने टाळी देत असले तरीही ओठात एक अन् पोटात एक अशी गत आहे. जाधव यांच्या नावाचा मात्र अनेकदा खेळण्याप्रमाणे सोयीस्कर वापर होत आला आहे. शेवटी सगळ्याच आघाड्यांवर फासे उलटे पडले तरीही जाधव अपक्ष लढतील. ते स्वत:च हे सांगत आहेत.यावरून वसमत व कळमनुरीत भाजप शिवसेनेशी वेगळाच गेम खेळत असल्याचेही नाकारता येत नाही. हिंगोलीत सेनेकडून रुपाली पाटील गोरेगावकर या इच्छुक असल्या तरीही त्यांची तिकिटावरच भिस्त दिसत आहे. अपक्ष म्हणून त्या लढतील व भाजप इतर ठिकाणी वापरत असलेल्या रणनीतीप्रमाणेच डाव देतील, अशी चिन्हे नाहीत. सेना दबावतंत्र म्हणूनही कुठे हे शस्त्र वापरताना दिसत नाही.... तर पक्षश्रेष्ठी दखल घेणारशिवसेनेच्या जागांवर दावा करून आम्हीच येथे विजयी होण्यासारखी स्थिती असल्याचे भाजप सांगत आहे. मात्र सेनेने जागा सोडणेच शक्य नसल्याने जर अशा ठिकाणी भाजपच्या कुणी बंडखोरी केली तर युतीधर्माला कलंक लागणार आहे. अशावेळी पक्षश्रेष्ठी दखल घेणार का? हा प्रश्न आहे.युती झाली तर युतीचा धर्म पाळू असे शिवसेनेकडून तरी ऐकायला मिळते. भाजपची मंडळी तसे काहीच बोलत नाही. मात्र जेथे अन्यायच झाल्याचे स्पष्ट चित्र दिसेल, तेथे शिवसेनेच्या कुणी बंडखोरी तर नवल वाटण्यासारखे काहीच नाही.पक्षीय तिकिटांसाठी सेना-भाजपमध्ये मारामार चालली असली तरीही मतदारांच्या मनात काय चालले, याचा अजून थांग लागत नाही. युतीला जेवढे सोपे वाटते तेवढे तरी ग्रामीण भागातील प्रतिक्रियांवरून दिसत नाही. शहरी भागातील झगमगाटावरून काढलेल्या अनुमानातूनच काहीजण लावत असलेले अंदाजही चुकण्याची भीती आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणElectionनिवडणूक