शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

६ ठिकाणावरील बोगस डॉक्टरांवर छापे, एका गावात आरोग्य पथकास ग्रामस्थांचा घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2022 12:36 IST

वैद्यकीय क्षेत्रातील कोणतीही पदवी नसलेल्या डॉक्टरांचा अहवाल आरोग्य विभागाने कार्यवाहीसाठी जिल्हास्तरावर पाठविला आहे.

वसमत:  ग्रामीण भागात बंगाली बोगस डॉक्टर नागरिकांच्या जिवाशी खेळ खेळत आहेत, असे वृत्त 'लोकमत'ने प्रकाशित करताच खळबळ उडाली आहे. आज सकाळी तालुका आरोग्य विभागाच्या ५ पथकाने बंगाली बोगस डॉक्टरांविरुध्द ६ ठिकाणी छापे टाकले. पथकाने तीन ठिकाणांवरुन वैद्यकीय साहित्य, औषध, गोळया ताब्यात घेतल्या आहेत. यादरम्यान, पार्डी खु येथे ग्रामस्थांनी आरोग्य विभागाच्या पथकास घेराव घालत छाप्यास विरोध केला. 

वसमत तालुक्यातील हाट्टा,पार्डी खु,आरळ,मरसुळ,सुनेगाव,पांगरा शिंदे या ठिकाणावर बंगाली बोगस डॉक्टर अनेक दिवसापासून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळत होते. कोरोना काळातही या बोगस डॉक्टरांनी उपचार केला. याबाबत लोकमतमध्ये वृत प्रकाशित होताच आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. 

तालुका आरोग्य अधिकारी डॉ संदीप काळे यांनी बोगस डॉक्टरांची माहीती घेतली. मंगळवारी आरोग्य विभागाचे तालुका आरोग्य आधिकारी डॉ संदीप काळे, डॉ पन्मवार, डॉ सिद्दीकी, डॉ कोठुळे, डॉ जिंतुरकर, डॉ महाजन, डॉ चिटमोगरे यांच्यासह आरोग्य कर्मचारी यांचे ५ पथके तयार केले. या पथकाने हाटा, पार्डी खु, आरळ या ठिकाणी छापे टाकले असता येथे बोगस बंगाली डॉक्टर रुग्णांवर उपचार करताना आढळून आले. पथकाने त्यांच्याकडील वैद्यकीय साहित्य, औषध, गोळ्या आदी साहित्य जप्त केले. पार्डी खु येथील डॉक्टरकडे कोणतीही वैद्यकीय पदवी नाही, हाटा येथील बोगस डॉक्टरकडे बोगस प्रमाणपत्र मिळून आले. तर पांग्रा शिंदे, मरसुळ, सुनेगाव या ठिकाणी आरोग्य पथक जाण्याआधिच बोगस डॉक्टरांनी पळ काढला. 

दरम्यान, पार्डी खु येथे बोगस बंगाली डॉक्टरच्या ठिकाणावर छापा मारताच येथील ग्रामस्थांनी आरोग्य विभागाच्या पथकास घेराव घातला. जप्त केलेले वैद्यकीय साहित्य पथकाकडून जमावाने हिसकावून घेतले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ संदिप काळे यांनी जमावास समजावून सांगत शांत केले. वैद्यकीय क्षेत्रातील कोणतीही पदवी नसलेल्या डॉक्टरांचा अहवाल आरोग्य विभागाने कार्यवाहीसाठी जिल्हास्तरावर पाठविला आहे. आरोग्य विभागाच्या छापा सत्राने बोगस डॉक्टरांचे धाबे दणाणले आहे.

अहवाल वरिष्ठांकडे पाठविला३ ठिकाणी छाप्यात सापडलेल्या साहित्य कागद पत्रांची पडताळणी करण्यात आली सर्व प्रकार बोगस आहे. नागरिकांनी डॉक्टरांची पदवी तपासून आरोग्य सेवा घेतली पाहीजे. बोगस डॉक्टरांकडून उपचार घेतल्याने जीवितास धोका होऊ शकतो. नागरिकांनी प्रशासनास मदत करावी. बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी अहवाल वरिष्ठांकडे पाठविला आहे. - डॉ संदिप काळे, तालुका आरोग्य आधिकारी,वसमत.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोलीdoctorडॉक्टर