शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

हिंगोली जिल्ह्यात रबीच्या पेरण्यांची उशिराने लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 17:34 IST

पाऊस लांबल्याने खरिपाचे मोठे नुकसान

ठळक मुद्देशेतकऱ्यांनी रबीच्या पेरण्यांची तयारी आता सुरू केली आहे

- विजय पाटील 

हिंगोली : जिल्ह्यात दिवाळीनंतरही बेमोसमी पावसाचा हाहाकार सुरूच असल्याने शेतकऱ्यांनी रबीच्या पेरण्यांची तयारी आता सुरू केली आहे. सध्या हरभऱ्याची पेरणी सुरू झाली असून अवघ्या पाच टक्के क्षेत्रावर पेरणी झाल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे.

जिल्ह्यात नोव्हेंबरच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यापर्यंत काही भागात पावसाने हजेरी लावली होती. शिवाय तोपर्यंतही खरिपाची पिके काढायला पावसाने संधीच दिली नाही. त्यात मोठे नुकसानही झाले. शिवाय पंचनाम्यांसाठीही शेतकऱ्यांनी शेतातील पीक काढणी व मळणी थांबविली होती. त्यामुळे लांबलेल्या या पावसामुळे रबीच्या पेरण्याची तयारी करण्यासाठी शेतीची मशागत करायलाही शेतकऱ्यांना वेळ मिळाला नाही. ज्या शेतकऱ्यांचे पीक दिवाळीपूर्वी व अतिवृष्टी होण्यापूर्वी निघाले, अशांचीच पाच टक्क्यांच्या आसपास पेरणी झाली आहे. इतर शेतकरी आता शेतातील पाण्याचा निचरा झाल्याने मशागतीच्या कामाला लागल्याचे दिसत आहे.गतवर्षी केवळ ८९000 हजार हेक्टरवर रबीची पेरणी झाली होती. यंदा अडीच लाख हेक्टरवर रबीची पेरणी होण्याचा अंदाज आहे. कृषी विभागाने गहू ४५ हजार ६२९ हेक्टर, हरभरा १.४८ लाख हेक्टर, रबी ज्वारी १२ हजार ६२३ हेक्टर, रबी मका ३ हजार ८१ हेक्टर, करडई ३६३ हेक्टर, सूर्यफूल १00 हेक्टर क्षेत्रात घेतले जाईल, असा २.१0 लाख हेक्टरवर रबी पेरणी होण्याचा अंदाज आहे.हरभरा, उसाचे क्षेत्र वाढणारतुडुंब भरलेले जलसाठे लक्षात घेता यंदा हरभऱ्याच्या क्षेत्रात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. तर थंडीची चाहूल लागल्याने आता गव्हाचे क्षेत्रही वाढणार आहे. त्यामुळे आणखी चाळीस हजार हेक्टरवर एकतर रबीची पेरणी होईल अन्यथा उसासह इतर पिकांकडे शेतकरी वळतील, असे दिसत आहे. ........... 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र