शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

खणके यांनी मांडला शेतकऱ्यांचा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 23:51 IST

तालुक्यातील केलसुला येथील अनंत ऊर्फ विनोद खणके यांनी ‘कौन बनेगा करोडपती’ या शोमध्ये संधी मिळाल्यानंतर शेतकºयांसमोर असलेले प्रश्न मांडले.

लोकमत न्यूज नेटवर्कसेनगाव : तालुक्यातील केलसुला येथील अनंत ऊर्फ विनोद खणके यांनी ‘कौन बनेगा करोडपती’ या शोमध्ये संधी मिळाल्यानंतर शेतकºयांसमोर असलेले प्रश्न मांडले.सेनगावसारख्या ग्रामीण भागातील शेतकरी खणके यांना थेट अभिनेता अमिताभ बच्चन यांच्यासोबत बसण्याची संधी मिळाल्याने प्रसिध्दीझोतात आले. ते तालुक्यातील केलसुला येथील अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले. ते गेल्या दहा वर्षांपासून केबीसीमध्ये जाण्याचा प्रयत्न करीत होते. यंदा संधी मिळाली. तर त्यांनी साडेबारा लाख रुपये जिंकले आहेत. खणके यांची सदर प्रतिनिधीने त्यांच्या गावी जाऊन भेट घेतली. खणके म्हणाले की, राज्यात शेतकºयांचे प्रश्न सोडवण्यास कोणीही वाली नाही. त्यामुळे अनेक वर्षांपासून ते कायम आहेत. पारंपरिक शेतीवर अवलंबून असलेला शेतकरी आज दुष्काळी परिस्थितीमुळे जगावे कसे? या विवंचनेत आहे. या कार्यक्रमातून त्यावर प्रकाश पडला. शिवाय अमिताभ बच्चन यांना भेटलो, यातच समाधान असल्याचे त्यांनी सांगितले. खणके यांनी अमिताभ यांच्यासमोर आमच्या भागात लाईट व्यवस्थित राहत नाही. आम्ही शेतकºयांनी शेतीला पाणी कसे देणार, असा प्रश्न मांडला. तर बच्चन यांनी शेतकºयांना मदत करण्याचे आवाहन प्रेक्षकांना केले. यामुळे खणके प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. आ.रामराव वडकुते यांनीही या शेतकºयाचा सत्कार केला.

टॅग्स :HingoliहिंगोलीSocialसामाजिक