शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

निधी वाटपाची प्रक्रिया संथपणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 00:16 IST

मानव विकासकडून गरोदर व बाळंत मातांना बुडीत मजुरी दिली जाते. प्रत्येकी चार हजार रूपये याप्रमाणे लाभार्थी मातेच्या खात्यावर ही रक्कम वर्ग करण्यात येते. जिल्ह्यातील ३ हजार ८९ महिलांना बुडित मजुरीचा लाभ दिला जाणार आहे. मात्र सदर निधी वाटपाची कामे आरोग्य खात्यातर्फे संथगतीने सुरू आहेत. तालुकास्तरावरून लाभार्थ्यांच्या याद्याही अप्राप्त आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मानव विकासकडून गरोदर व बाळंत मातांना बुडीत मजुरी दिली जाते. प्रत्येकी चार हजार रूपये याप्रमाणे लाभार्थी मातेच्या खात्यावर ही रक्कम वर्ग करण्यात येते. जिल्ह्यातील ३ हजार ८९ महिलांना बुडित मजुरीचा लाभ दिला जाणार आहे. मात्र सदर निधी वाटपाची कामे आरोग्य खात्यातर्फे संथगतीने सुरू आहेत. तालुकास्तरावरून लाभार्थ्यांच्या याद्याही अप्राप्त आहेत.जिल्ह्यातील औंढा नागनाथ, सेनगाव व हिंगोली या तीन तालुक्यांचा मानव विकासमध्ये समावेश आहे. या तीन्ही तालुक्यातील अपेक्षित लाभार्थी महिलांची तालुकानिहाय आकडेवारी यामध्ये हिंगोली तालुक्यातील १०७२ लाभार्थी महिलांचा समावेश आहे. सेनगाव तालुक्यातील १०९३ आहे. तर औंढा नागनाथ तालुक्यातील ९२४ याप्रमाणे एकूण ३०८९ महिलांना बुडित मजुरी देण्यात येणार आहे. अनुसूचित जाती, अनु. जमाती आणि दारिद्र्य रेषेखालील गरोदर व बाळंत महिलांना या योजनेचा लाभ देण्यात येतो. गरोदरपणात आणि प्रसुतीनंतरचा कालावधीत मानव विकासकडून मातांची मजुरी बुडते. सदर महिला आर्थिक लाभासाठी मजुरी करण्यासाठी किंवा कामावर जाऊ नये याची काळजी घेत मानव विकास योजने अंतर्गत बुडित मजुरी दिली जाते. प्रथम दोन हजार आणि प्रसुतीनंतर दोन हजार रुपये एकूण चार हजार रूपये अशी लाभाची रक्कम आहे. सदर लाभाची रक्कम ही लाभार्थी महिलेच्या बँक खात्यावर वर्ग केली जाते. मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत आरोग्य विभागाकडे गरोदर मातांना बुडित मजुरी म्हणून अर्थसहाय्यसाठी १ कोटी २३ लाख ५६ हजार रूपये निधीस मंजुरी मिळाली आहे. गर्भवती महिलांची आरोग्य तपासणी व ० ते ६ वयोगटातील बालकांची तसेच माता यांची आरोग्य तपासणी तसेच औषधोपचार व शिबीरे यासाठी ४६ लाख ८ हजार रूपये निधीस मंजूरी मिळाली आहे. मानव विकासकडून या दोन्ही प्रकारचा निधी आरोग्य खात्याकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे आता पुढील प्रक्रिया करून आरोग्य खात्याने लाभार्थी महिलांना बुडित मजुरीची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यावर वेळेत वर्ग करणे गरजेचे आहे.सदर निधीस मानव विकासकडून मंजुरी मिळाली असली तरी, अद्याप याबाबत आरोग्य विभागातर्फे निधी लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचे नियोजन करण्यात आले नाही. तालुका स्तरावरून याद्याही अप्रपाप्त आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम कधी वर्ग होईल हा एक प्रश्न आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. जेणेकरून लाभार्थ्यांना वेळेत लाभ मिळेल. सध्या तालुकास्तरावरून याद्या मागविल्या जात असल्याचे आरोग्य खात्याच्या संबधित विभागाकडून माहिती देण्यात आली.शासनाकडून लाभार्थ्यांना दिली जाणारी बुडित मजुरीची रक्कम बँक खात्यात जमा केली जाणार असून याबाबत संबधित तालुका आरोग्याधिकाºयांनी याद्या दाखल करण्याच्या सूचनाही आहेत.

टॅग्स :Hingoli z pहिंगोली जिल्हा परिषदHealthआरोग्य