शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

रहिवासी प्रमाणपत्र देण्यास चालढकलपणा; महिलांनी ठोकले ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे

By विजय पाटील | Updated: July 1, 2024 18:42 IST

प्रमाणपत्रासाठी चालढकलपणा केला जावू लागल्याने महिला व ग्रामस्थ संतप्त

हिंगोली: राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी’ योजना सुरु केली असून, यासाठी प्रमाणपत्र आवश्यक केले आहे. प्रमाणपत्र देणे सुरु असतानाच चालढकलपणा होऊ लागला आहे. हे पाहून सेनगाव तालुक्यातील कडोळी येथील महिलांनी सोमवारी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले.

‘मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी ’ योजना जाहीर होताच सर्वच ठिकाणी ग्रामपंचायतीने रहिवासी प्रमाणपत्र देणे सुरु केले. सदर योजनेत रहिवासी प्रमाणपत्र लागत आहे, हे समजल्यापासून १ जुलै रोजी सकाळपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर गर्दी झाली. परंतु प्रमाणपत्रासाठी चालढकलपणा केला जावू लागला. त्यामुळे महिला व ग्रामस्थ संतप्त झाले. यानंतर सकाळी अकरा वाजता महिलांनी कडोळी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले.

रहिवासी प्रमाणपत्र मोफत द्यावे...रहिवासी प्रमाणपत्रासाठी जी काही शासनाची शुल्क आहे ती घेतली तर आमचे काही म्हणणे नाही. परंतु अव्वाच्या सव्वा पैसे घेतले जात असल्यामुळे संतोष माहोरकर, विगेश देवकर यांच्यासह चार ते पाच महिलांनी चक्क ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले. याबाबत ग्रामसेवकाला फोन केला असता त्यांचा फोन ‘नॉटरिचेबल’ येऊ लागला होता.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतHingoliहिंगोली