शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 00:35 IST

इतर जिल्ह्यांत महावितरणने शिकाऊ वीजतंत्री व तारतंत्री भरतीत स्थानिकांना प्राधान्य दिले. हिंगोलीत मात्र जाणीवपूर्वक डावलले जात आहे. त्यामुळे याबाबत उत्तर न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा तांत्रिक अ‍ॅप्रेंटीस असोसिएशन या संघटनेकडून देण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : इतर जिल्ह्यांत महावितरणने शिकाऊ वीजतंत्री व तारतंत्री भरतीत स्थानिकांना प्राधान्य दिले. हिंगोलीत मात्र जाणीवपूर्वक डावलले जात आहे. त्यामुळे याबाबत उत्तर न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा तांत्रिक अ‍ॅप्रेंटीस असोसिएशन या संघटनेकडून देण्यात आला.राज्यभर वीजतंत्री व तारतंत्री याची पदभरती होत आहे. इतर ठिकाणी महावितरणने स्थानिक उमेदवारांनाच प्राधान्य दिले आहे. त्यामुळे अशा ठिकाणी जास्त गुण असतानाही हिंगोली जिल्ह्यातील उमेदवार डावलले गेले. आता हिंगोली जिल्ह्यात भरती करताना मात्र महावितरण सरसकट उमेदवारांचा विचार करीत आहे. त्यामुळे स्थानिक आयटीआय केलेल्या उमेदवारांमध्ये असंतोषाची भावना आहे. परजिल्ह्यात संधी मिळणार नाही आणि स्वजिल्ह्यातही परजिल्ह्यातील उमेदवारांशी स्पर्धा करावी लागणार असेल तर महावितरणने आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी करण्यात आली. जर स्थानिक उमेदवारांनाच यात प्राधान्य दिले नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.संघटनेचे जिल्हाध्यक्ष आनंद स्वामी, माजी पं.स. सभापती दिलीप घुगे आदींच्या नेतृत्वात भरतीतील स्थानिक उमेदवारांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले. जिल्हाधिकाºयांसह इतरांनाही निवेदन देण्यात आले आहे.मागील काही दिवसांपासून हा मुद्दा गाजत आहे. उमेदवार दुसºया जिल्ह्यात झालेल्या भरतीच्या याद्या दाखवत आहेत. मात्र स्थानिक अधिकारी त्यांना दाद देत नसल्याचे चित्र आहे. या विषयावर चर्चा करण्यासाठी वरिष्ठ अधिकारीही उपलब्ध होत नसल्याने उमेदवारांमध्ये संताप आहे. आजही या उमेदवारांना कोणतेच ठोस आश्वासन मिळाले नाही. बेरोजगारांचा जाणीवपूर्वक छळ करण्याची भूमिका अधिकारी घेत असल्याचा आरोप केला जात होता. याबाबत काही लोकप्रतिनिधीनींही सूचना दिल्या. मात्र महावितरण बधत नसल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Hingoliहिंगोलीmahavitaranमहावितरण