शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या तरुणीवर धर्मांतरासाठी दबाव, तरुणाला अटक; ग्रामीण भागातही पोहोचले लोण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2022 13:29 IST

बीए तृतीय वर्षामध्ये शिक्षl असलेल्या 'तिची' गावातील साजिद रफिक खान पठाण या तरुणासोबत ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. दरम्यानच्या काळात या मुलीच्या कुटुंबीयांनी तिचा विवाह जुळवला होता. पण, प्रेमात आकंठ बुडालेली ती प्रियकर साजीद रफिक खान पठाण याच्यासोबत पळून गेली.

आखाडा बाळापूर (जि. हिंगोली) : श्रद्धा-आफताब प्रकरणाने संपूर्ण देश सुन्न झालेला असतानाच कळमनुरी तालुक्यातील ग्रामीण भागातही लिव्ह इन रिलेशनशिपमधून धर्मांतर करण्यासाठीचा दबाव टाकल्याची व लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार केल्याची तक्रार दाखल झाली. लग्नाचे आमिष दाखवत एका महाविद्यालयीन तरुणीला पळवून नेऊन वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केला. तिने लग्नाचा तगादा लावला म्हणून त्याने लिव्ह इन रिलेशनशिपसाठी बाँड बनवला. तरीही तिने लग्नाचा हट्ट धरल्यानंतर मुस्लीम धर्म स्वीकारला तरच तुझ्याशी निकाह करेन, असे सांगत तिच्यावर जबरदस्ती केली. धर्मांतर तिला मान्य नसल्याने अखेर तिने आई-वडिलांचे घर गाठले. वेळोवेळी लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार करणाऱ्या तरुणाविरुद्ध बाळापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला. कळमनुरी तालुक्यातील रेडगाव येथील एक २१ वर्षीय तरुणी कै. शंकरराव सातव कॉलेज, जवळा पांचाळ येथे बीए तृतीय वर्षामध्ये शिक्षण घेत होती. त्यावेळी गावातील साजिद रफिक खान पठाण या तरुणासोबत ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. दरम्यानच्या काळात या मुलीच्या कुटुंबीयांनी तिचा विवाह जुळवला होता. पण, प्रेमात आकंठ बुडालेली ती प्रियकर साजीद रफिक खान पठाण याच्यासोबत पळून गेली.८ जुलै २०२२ रोजी ते दोघे जवळा पांचाळ येथून पळून गेले. सुरुवातीला परभणी, औरंगाबाद, फरीदाबाद, दिल्ली असे पळून जाऊन तिथे थांबले. तिथे एक रूम भाड्याने घेऊन राहत होते. तिने लग्नासाठी हट्ट धरला. परंतु त्याने टाळाटाळ केली. वेळोवेळी तिच्या मनाविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. फरीदाबाद दिल्ली येथे एका वकिलाकडे जाऊन लिव्ह इन रिलेशनशिपचा बाँड तयार केला. त्यावर दोघांनी स्वाक्षऱ्या केल्या. पुन्हा ते परभणी आणि गावाकडे परतले.

‘धर्मांतर केलेस, तरच मी तुझ्याशी निकाह करतो’- तिने लग्नासाठी तगादा लावला असता तू मुस्लिम धर्म स्वीकारलास, धर्मांतर केलेस तरच मी तुझ्याशी निकाह करतो, असे तो म्हणाला. तिला धर्मांतर करणे मान्य नसल्याने ती भावाला बोलून माहेरी निघून गेली आणि पोलिस ठाणे गाठले.  - मुलीच्या तक्रारीवरून आरोपी साजिद रफिक खान पठाण याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी किशोर कांबळे हे करीत आहेत. या प्रकरणातील आरोपीस अटक केली आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीLove Jihadलव्ह जिहादLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट