शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

खड्ड्यांमुळे गर्भवती रस्त्यातच झाली प्रसूत; बाळ आणि माता सुखरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 17:30 IST

रस्त्यातील खड्ड्यांमुळे तिच्या प्रसव कळा जास्तच वाढल्या. यामुळे दवाखान्यात पोहचण्याआधीच ति गाडीतच प्रसूत झाली.

आखाडा बाळापुर (हिंगोली ) : आज सकाळी गावातील एका महिलेस प्रसूतीच्या कळा आल्याने तिच्या वडिलाने दवाखान्यात जाण्यासाठी चारचाकी गाडी बोलावली. गाडीत ते बाळापूरच्या ग्रामीण रुग्णालयाकडे निघाले. मात्र, रस्त्यातील खड्ड्यांमुळे तिच्या  प्रसव कळा जास्तच वाढल्या. यामुळे दवाखान्यात पोहचण्याआधीच ति गाडीतच प्रसूत झाली. त्याच अवस्थेत माता आणि बाळास दवाखान्यात नेऊन दाखल करण्यात आले असून दोघांची प्रकृती चांगली आहे. 

कळमनुरी तालुक्यातील देवजना येथील सावित्रा संजय कल्याणकर या गर्भवती महिलेस आज सकाळी प्रसव कळा सुरु झाल्या. यामुळे तिला बाळापूरच्या ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यासाठी तिचे वडील बबन खंडोजी चव्हाण यांनी चारचाकी क्रुझर गाडी बोलावली. सकाळी ९:४५ वाजेच्या सुमारास ते दवाखान्याच्या दिशेने निघाले.  मात्र, देवजना फाटा ते शेवाळा यादरम्यान रस्ता खराब असल्याने सावित्री यांना त्रास होऊ लागला. खड्ड्यांमुळे तिच्या प्रसव कळा जास्तच वाढल्या व याच रस्त्यावर ती  सकाळी दहा वाजून पाच मिनिटाला गाडीतच बाळंत झाली. 

याच अवस्थेत बाळ आणि आईला ग्रामीण रुग्णालयात आणले गेले. तेथे प्रवेशद्वाराजवळच गाडी उभी करण्यात आली. बाळ आणि आईबद्दल कळताच रुग्णालयातील महिला कर्मचारी धुरपता पंडित, लताबाई मुनेश्वर, रमाबाई पाईकराव ,लताबाई नरवाडे आदींनी गाडीकडे धाव घेतली. त्यांनी बाळ- बाळंतीण यांची पाहणी करून गाडीतच नाळ कापली. त्यानंतर बाळाला व बाळंतणीला दवाखान्यात घेतले. यानंतर त्यांची तपासणी करण्यात आली. बाळ-बाळंतीण दोघेही सुखरूप असल्याचे वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी सांगितले .

या फजिती मुळे कुटुंबीय आणि नातेवाईक मात्र चांगलेच हादरले होते. गाडी चालक राजू गाडे यांनी मी गाडी हळू चालवत होतो मात्र रस्त्यामध्ये खड्डेच जास्त असल्याने त्यांना त्रास वाढला व त्या दहा मिनिटांच्या अंतरातच प्रसूत झाल्या. तर मुलीचे पिता बबन चव्हाण यांनी मुलगी आणि बाळ दोघेही सुखरूप असल्याने समाधान व्यक्त सुटकेचा निश्वास टाकला.  

टॅग्स :Potholeखड्डेHingoliहिंगोलीroad safetyरस्ते सुरक्षाhospitalहॉस्पिटल