शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांवर खड्डे; वाहनचालक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:55 IST

रेल्वे उड्डाण पुलावर गतिरोधकाची मागणी हिंगोली : शहरातील रेल्वे उड्डाण पुलावर गतिरोधक नसल्यामुळे वाहने वेगाने चालविली जात आहेत. त्यामुळे ...

रेल्वे उड्डाण पुलावर गतिरोधकाची मागणी

हिंगोली : शहरातील रेल्वे उड्डाण पुलावर गतिरोधक नसल्यामुळे वाहने वेगाने चालविली जात आहेत. त्यामुळे छोटे-मोठे अपघात घडत आहेत. या पुलावरील वाहनांची वर्दळ लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने गतिरोधक तसेच दुभाजक बसवावे, अशी मागणी या भागातील नागिरकांनी केली आहे.

हरभरा काढणीला आला वेग

डिग्रस कऱ्हाळे : हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे, दाटेगाव, लोहगाव, सावळी आदी गावांत रबी हंगामातील हरभरा पीक काढणी दोन-तीन दिवसांपासून सुरू केली आहे. गतवर्षीपेक्षा यावर्षी हरभरा पिकाचे चांगले उत्पन्न होईल, अशी आशा या भागातील शेतकऱ्यांना आहे.

वानरउड्यांना डिग्रसकर वैतागले

डिग्रस कऱ्हाळे: हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे येथे मागील पाच-सहा दिवसांपासून वानरांनी उच्छाद मांडला आहे. घरावरील पत्रांवर व छतावर उड्या मारून वस्तुंची नासधूस करीत आहेत. एवढेच काय अंगणात ठेवलेल्या पदार्थावरही वानरे ताव मारत आहेत. वानरांना हाकलण्याचा प्रयत्न केल्यास अंगावर धावून येत आहेत. वन विभागाने या वानरटोळीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

रस्त्याचे काम लवकर पूर्ण करण्याची मागणी

हिंगोली : नरसी फाटा ते लिंबाळा (मक्ता) या रस्त्याचे काम मागील काही दिवसांपासून सुरू आहे. सद्य:स्थित रस्त्याची एक बाजू पूर्ण झाली आहे. दुसरी बाजू अपूर्णच आहे. यामुळे या ठिकाणावरुन ये-जा करणाऱ्यांना वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. संबंधितांनी याची दखल घेऊन हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करावा, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.

बसस्थानकातील शौचालयाची दुरवस्था

हिंगोली : बसस्थानकातील शौचालयाची दुरवस्था झाली असल्यामुळे प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मागील काही महिन्यांपासून नवीन बसस्थानकाचे काम रखडले असल्यामुळे प्रवाशांना तात्पुरत्या जागेत बसावे लागत आहे. आगार प्रमुखांनी याची दखल घेऊन शौचालयाची दुरुस्ती करून प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी

कळमनुरी : तालुक्यातील कांडली, आखाडा बाळापूर, डोंगरकडा, वारंगा, बऊर, रामेश्वरतांडा, कानोबा टाकळी, वाकोडी, मसोड आदी गावांत विजेचा लपंडाव नित्याचाच झाला आहे. वीजपुरवठा अचानक खंडित होत असल्यामुळे विजेवर चालणारी उपकरणे जळून जात आहेत. वेळोवेळी महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सांगण्यात आले. परंतु, कोणीही लक्ष देण्यास तयार होत नाही. महावितरणच्या वरिष्ठांनी याची दखल घेऊन वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.