लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : महाराष्टÑ पोेलीस दलातील पोेलीस कर्मचाऱ्यांच्या कामाच्या स्वरूपात बदल झाला आहे. त्यामुळे पोलीस शिपाई पदावर बुद्धिमान उमेदवारांची निवड व्हावी यासाठी पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेतील शारीरिक चाचणीदरम्यान होणाºया दुर्घटना इत्यादी बाबी विचारात घेऊन शासनाने आता पोलीस भरती प्रक्रियेत बदल केला आहे.नव्या पद्धतीमुळे पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत उमेदवारांची लेखी परीक्षा प्रथम घेण्यात येणार आहे. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांपैकी पोलीस घटक कार्यालयाच्या आस्थापनेवर रिक्त होणाºया पदांच्या प्रमाणात आवश्यक तेवढ्याच योग्य उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी बोलाविण्यात येणार आहे. त्यामुळे भरती प्रक्रिया दीर्घकाळ सुरू न राहता जलद गतीने पार पडली. त्यामुळे जिल्ह्याबाहेरील उमेदवारांना जास्त दिवस ताटकळत राहावे लागणार नाही.भरती प्रक्रियेत केलेल्या बदलांचा फायदा उमेदवारांना निश्चितच होईल, असे सहायक समादेशक आर. टी. तडवी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
पोलीस भरती प्रक्रियेत बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 01:00 IST