येथील जिल्हा रुग्णालय परिसरातील कोविड सेंटरमध्ये रुग्णांना उपचारासाठी ठेवले जात आहे. रुग्णालयात रुग्ण दाखल झाल्यानंतर नातेवाईकही सेंटरच्या बाहेर गर्दी करीत होते. वारंवार सांगूनही नातेवाईकांची गर्दी मात्र कमी होत नव्हती. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटर परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिवाय जिल्हा रुग्णालयातील सुरक्षारक्षकही कर्तव्य बजावत आहेत. कर्तव्यावर हजर पोलीस कर्मचारी व सुरक्षारक्षक सेंटर परिसरात विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करीत आहेत. त्यामुळे सेंटर परिसरात होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण आणणे शक्य झाले आहे. हिंगोली जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू लागल्याने जिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी बाधित रुग्णांची गर्दी होत आहे. रुग्णालय प्रशासनाकडून नियोजन केले जात असून, नातेवाईकांनी कोविड सेंटर परिसरात गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
फोटो न. १५