शहरं
Join us  
Trending Stories
1
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
2
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
3
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
4
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
5
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
6
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
7
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
8
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
9
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
10
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
11
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
12
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
13
स्ट्रगलच्या काळात राजकुमार रावची झालेली १० हजारांची फसवणूक, असं काय घडलं होतं?
14
Arvind Kejriwal : "जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल
15
"फोडाफोडीचं राजकारण जनतेला अमान्य’’, एक्झिट पोलनंतर एकनाथ खडसेंचा भाजपाला टोला
16
आम्हाला फक्त भारताविरूद्धच नाहीतर वर्ल्ड कप देखील जिंकायचाय - बाबर आझम
17
"कठीण प्रसंग येतातच, मी पळ काढणार नाही", Hardik Pandya ने सांगितला खडतर प्रवास
18
कंगना, कन्हैया, संबित पात्रा, अन्नामलाई, विशाल पाटील यांच्या हॉट सिटवर असा आहे एक्झिट पोल
19
'मालवणच्या समुद्रकिनारी तब्बूचा फोन...', छाया कदम यांनी सांगितला मजेशीर किस्सा
20
इंडिया आघाडीला महाराष्ट्र, बिहार, कर्नाटकात धक्कादायक आकडे; एक्झिट पोलमध्ये विरोधी पक्षांनी 'या' राज्यात मारली बाजी

भगरीच्या प्रसादातून पुन्हा विषबाधा, हिंगोली जिल्हा रुग्णालयात दिडशे जणांवर उपचार सुरू

By विजय पाटील | Published: February 21, 2024 12:42 PM

कळमनुरी तालुक्यातील रेणापूर येथील घटना

हिंगोली : अखंड हरिनाम सप्ताहात भगरीच्या प्रसादातून जवळपास दिडशे जणांना विषबाधा झाल्याची घटना कळमनुरी तालुक्यातील रेणापूर येथे २० फेब्रुवारी रोजी घडली. प्रसाद खाल्ल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास उलट्या, मळमळ होणे सुरू झाल्याने रूग्णांना हिंगोलीच्या जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

रेणापूर येथील मारोती मंदिरात मागील चार दिवसांपासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. २० फेब्रुवारी रोजी जया एकादशीनिमित्त उपवास असणाऱ्या भाविकांसाठी सायंकाळी ६ वाजता जवळपास ४० किलो भगरीचा प्रसाद ठेवण्यात आला होता. हा प्रसाद गावातील ५०० लोकांनी खाल्ला. परंतु, मध्यरात्रीच्या सुमारास काहींना उलट्या, मळमळ, डोकेदुखी आदी लक्षणे जाणवू लागली. त्यानंतर मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास ३५ जणांना येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तातडीने उपचार सुरू केले. तर दुसऱ्या दिवशी २१ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास जवळपास आणखी ३० जणांना लक्षणे जाणवत असल्यामुळे जिल्हा रूग्णालयात आणण्यात आले. या सर्व जणांवर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती चांगली असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

भाऊराव पतंगे, पांडूरंग पतंगे, अनिल पतंगे, सोनाजी पतंगे, शेषराव वानखेडे, कासूबाई श्रृंगारे, श्याम श्रृंगारे, बाबाराव कुटे, शिवाजी पतंगे यांच्यासह जवळपास दिडशे जणांना भगरीतून विषबाधा झाली आहे. जिल्हा रूग्णालयात प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ.दीपक मोरे, डाॅ.प्रसाद मस्के, डाॅ.नंदकिशोर करवा, डाॅ. देशमुख, डाॅ.दीपक मोरे, डाॅ.विशाल पवार, आशा क्षिरसागर, राठोडे आदींनी उपचार केले.दरम्यान, आरोग्य विभागाच्या वतीने गावात वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक पाठविण्यात आले असून, आरोग्य विभाग रेणापूरवर लक्ष ठेवून आहे.

टॅग्स :food poisoningअन्नातून विषबाधाHingoliहिंगोली