शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
4
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
5
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
6
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
7
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
8
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
9
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
10
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
11
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
12
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
13
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
14
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
15
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
16
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
17
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
18
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
19
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
20
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

नैसर्गिक प्राणवायूसाठी किमान एकतरी झाड लावावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:22 IST

वनविभागासह पर्यावरणप्रेमींनी केले नागरिकांना आवाहन हिंगोली : वातावरणातील नैसर्गिक प्राणवायूचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने किमान एक तरी झाड लावणे ...

वनविभागासह पर्यावरणप्रेमींनी केले नागरिकांना आवाहन

हिंगोली : वातावरणातील नैसर्गिक प्राणवायूचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने किमान एक तरी झाड लावणे आवश्यक आहे. नुसते झाड लावून कार्य पूर्ण होत नसते तर लावलेल्या झाडांचे संगोपन करणे गरजेचे आहे, असे मत पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केले.

१९७० मध्ये पॅरिस येथे भरलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये शालेय शिक्षणात पर्यावरण शिक्षणावर भर देण्यात आला. १९७२ मधील जून महिन्यात स्टॉकहोम येथे भरलेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण परिषदेत जागतिक पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्याची जबाबदारी मानवाचीच असल्याचे म्हटले आहे. त्यानुसार आंतरराष्ट्रीय पर्यावरण शिक्षण कार्यक्रम अंमलात आणला व त्याची उद्दिष्टे ऑक्टोबर १९७५ मध्ये बेलग्रेड येथील कृती सत्रात ठरविण्यात आली. पर्यावरणीय शिक्षणात सामाजिक तंत्रज्ञानाविषयक,नैसर्गिक पर्यावरणाचा एकत्रितपणे विचार होणे गरजेचे आहे. पर्यावरण शिक्षण जीवनभर चालणारी प्रक्रिया आहे. परंतु, दरवर्षी ५ जून (पर्यावरण दिन) जवळ आला की, तो साजरा कसा करता येईल, याचेच कोडे सर्वांना पडते. गत दीड वर्षापासून तर कोरोनाने सळो की पळो करुन सोडले आहे. बाहेर पडणेही मुश्कील होऊन बसले आहे. कोरोना महामारीतून बाहेर पडून पर्यावरणाला कोणाची दृष्ट न लागता पर्यावरण कसे राखता येईल, याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. पर्यावरण दिनानिमित्त प्रत्येक व्यक्तीने एक तरी लावून पर्यावरण दिन साजरा करावा, असे आवाहनही पर्यावरणप्रेमींनी केले आहे.

प्रतिक्रिया

आपले जगणे आणि निसर्गाच्या प्रति कर्तव्य, जबाबदारी यापासून कोसो दूर मानव आहे. म्हणूनच की काय कोरोनाच्या काळात निसर्गाचे शिक्षण घेणे हा महत्त्वाचा विषय होत चालला आहे.

पहिली वर्गापासून कृषी विषय अभ्यासक्रमात ठेवून त्यात शेती, माती, झाड, पाणी, अन्नधान्याच्या विषयी पाठ असावेत. ते पाठ नुसते अभ्यासक्रमापुरते मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष जीवनात कृतीत उतरले पाहिजेत आणि या कृतीवर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन झाले पाहिजे. असे झाले तरच पर्यावरण संतुलनाच्या आसपास आपण जाऊ शकतो.

-अण्णा जगताप, पर्यावरणप्रेमी

पर्यावरण दिनानिमित्त झाड लावून चालत नाही. लावलेल्या रोपट्यास खतपाणी देेऊन त्याचे संगोपन केल्यास झाड आपल्याला सावली देते. शाळा, महाविद्यालयांतून पर्यावरण बाबत जनजागृती करणेही महत्त्वाचे आहे.

-रतन आडे, पर्यावरणप्रेमी

झाडे मोफत ऑक्सिजन पुरवत असतात. झाडे लावणे आणि लावलेली झाडे जगविणे हेही तितकेच गरजेचे आहे. दरवर्षीच्या पावसाळ्यात प्रत्येकाने झाड लावून त्याचे संगोपन करणे ही काळाची गरज आहे. आपण सर्वजण निसर्गाचे काहीतरी देणे लागतो म्हणून यावर्षी साजऱ्या होत असलेल्या पर्यावरण दिनी सर्वांनी मिळून पर्यावरणाच्या संवर्धन व संरक्षणाची शपथ घेऊन किमान एका रोपाची लागवड करावी.

- विश्वनाथ टाक, वनपरिक्षेत्र अधिकारी

पर्यावरण दिनी सर्वांनी मिळून पर्यावरणाच्या संवर्धन व संरक्षणाची शपथ घेऊन किमान एकतरी रोप लावणे आवश्यक आहे. आंबा, जांभूळ, लिंब, पळस, आवळा, चिंच, वड, उंबर, पिंपळ, बदाम, बोर, करांज, साग, खैर, कवुट, बेल आदी झाडांपैकी एक तरी रोप लावून पर्यावरण दिन साजरा करावा.

- विश्वंभर पटवेकर महाराज, पर्यावरणप्रेमी

शहरातील प्रत्येक व्यक्तीने उपलब्ध मोकळ्या जागेत,शेतामध्ये, बांधावर,पडीक जमिनीवर, रस्ता, दुतर्फा कॉर्नर, नदी,नाल्यांच्या काठावर वृक्ष लागवड करणे आवश्यक आहे. मानवाच्या अस्तित्वासाठी हे काम महत्त्वाचे आहे.

-जी.पी. मिसाळ,वन परिमंडळ अधिकारी