शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

योजनेचे अर्ज घेण्यासाठी वसमतकरांच्या उड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 00:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वसमत : शहरात नगरपालिकेच्या माध्यमातून बेघरांना घरे बांधून देण्यासाठीची पंतप्रधान आवास योजना राबवली जाणार आहे. या ...

लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : शहरात नगरपालिकेच्या माध्यमातून बेघरांना घरे बांधून देण्यासाठीची पंतप्रधान आवास योजना राबवली जाणार आहे. या योजनेचे टेंडर सुटले व गुत्तेदाराने शहरात सर्व्हे सुरू केल्याचे वृत्त समजताच योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी नगरपालिकेत प्रचंड गर्दी केली आहे. योजनेची माहिती नागरिकांना नसल्याने नागरिक थेट नगरपालिकेत धाव घेत आहेत.पंतप्रधान आवास योजना वसमत शहरात राबवली जाणार आहे. योजनेचा ‘डिपीआर’ तयार करण्याच्या कामाला ‘सर्वानुमते’ मंजुरी मिळाल्यापासून गुत्तेदाराने काम सुरू केले आहे. या योजनेत योजनेची प्रसिद्धी, माहिती देण्याचे काम एजन्सीने करावयाचे आहे. मात्र अद्याप शहरात योजनेचे साधे पत्रकही नागरिकांना पहावयास मिळालेले नाही. लाभार्थ्यांची घरोघर जावून प्रत्यक्ष पाहणी करून निवड करावयाची आहे. मात्र ते कामही सुरू नाही. त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेचे घरकुल मिळणार एवढीच माहिती नागरिकांना झाली व थेट नगरपालिकेत गर्दी वाढली.योजनेचे फॉर्म लाभार्थ्यांना घरपोहोच देवून लाभार्थी निवड करावयाची असताना नागरिकांना कोणतीच माहिती न देता नगरपालिकेत येण्यास भाग पाडण्याचा हा अजब प्रकार आहे. योजनेचा डीपीआरच तयार होवून शासनाकडे गेलेला नसल्याचे समजते. अशा परिस्थितीत लाभार्थ्यांची निवड कोण्या पद्धतीने होणार? हाच खरा प्रश्न आहे. वसमत शहरात राबवली जाणारी पंतप्रधान आवास योजना ही चांगली व गोरगरीबांसाठीची महत्वाची योजना आहे.या योजनेचा लाभ लाभार्थ्यांना योग्य रितीने व्हावा, यासाठी योजनेचा प्रचार प्रसारावर भर देण्याची मागणी होत आहे.