शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

चोंढी शहापुरात तणावानंतर शांतता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 00:35 IST

तालुक्यातील चोंढी शहापूर येथे महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे उघडकीस आल्यानंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस प्रशासनाने या घटनेची वेळीच गंभीर दखल घेतल्याने गावात शांतता प्रस्थापित करण्यात यश आले आहे. याबाबत गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : तालुक्यातील चोंढी शहापूर येथे महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे उघडकीस आल्यानंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस प्रशासनाने या घटनेची वेळीच गंभीर दखल घेतल्याने गावात शांतता प्रस्थापित करण्यात यश आले आहे. याबाबत गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.चोंडी शहापूर येथील दलितवस्तीमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा आहे. या पुतळ्याची विटंबना केल्याची बाब शुक्रवारी उघडकीस आली. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, हट्टा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, एपीआय नाईक, जमादार शेख खुद्दूस यांनी धाव घेतली. लगेचच उपविभागीय पोलीस शशिकिरण काशिद, एलसीबीचे मारोती थोरात, औंढ्याचे पोनि कुंदनकुमार वाघमारे, वसमतचे एपीआय जाधव, आदींनी घटनास्थळी पंचनामा करून आरोपींचा शोध घेण्यासाठी श्वान पथकासही पाचारण केले. परंतु श्वान राष्टÑीय महामार्गापर्यंतच धावले. यावेळी गावात मोठ्या संख्येने समाज संघटीत झाला होता. तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी समयसूचकता दाखवत आरोपींवर कठोर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. काशिद यांनी आरोपींना पकडण्याचे आश्वासन देवून गावात शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन केले. उपस्थित समाजबांधवांनी पोलिसांना दिलेल्या आश्वासनानंतर पुतळा शुद्धीकरण करीत धर्मवंदना देण्यात आली. या प्रकरणात हट्टा पोलीस ठाण्यात संशयित गोरखनाथ गंगाराम काळे व संतोष गणपत कबले या दोघांसह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.