शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोली येथे द्वितीय मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 00:02 IST

हिंगोली शहरातील जिल्हा परिषद मैदानावर १८ नोव्हेंबर रोजी उडान सोशल अक्टीव्हीटी ग्रुपच्या वतीने द्वितीय हिंगोली मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत हजारोंच्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदविला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : हिंगोली शहरातील जिल्हा परिषद मैदानावर १८ नोव्हेंबर रोजी उडान सोशल अक्टीव्हीटी ग्रुपच्या वतीने द्वितीय हिंगोली मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत हजारोंच्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदविला.हिंगोली येथील जिल्हा परिषद मैदान येथून उडान सोशल अक्टीव्हीटी ग्रुपच्या वतीने आयोजित मॅरेथॉन स्पर्धेस हिरवा झेंडा दाखवून सुरूवात करण्यात आली. यावेळी अशोक अग्रवाल, गणेश वाघ, डॉ. सत्यनारायण तापडिया, डॉ. श्रीधर कंदी यांच्यासह स्पर्धक.स्पर्धेचे सहआयोजक क्लासीक टीव्हीएस हिंगोली व तापडिया ट्रेडर्स हे होते. सदर स्पर्धा तीन गटात आयोजित करण्यात आली होती. महिला गटामध्ये १८ ते ४० तीन कि.मी. धावणेमध्ये कोमल मदन जाधव हिंगोली व ४० ते ६० वयोगटामध्ये अ‍ॅड. अश्विनी शहा हिंगोली, तसेच पुरूष गटामध्ये १८ ते ४० वयोगटात कृष्णा पांडुरंग माने परभणी, द्वितीय किरण गवते हिंगोली, तसेच ४० ते ६० वयोगटात सूर्यकांत शंकर खाडे प्रथम, द्वितीय अतुल बोरकर, तृतीय दिनेश होकर्णे व प्रा.सुरेंद्र साहू हिंगोली, ६० व त्यापुढील वयोगटात किरण लाहोटी हिंगोली प्रथम, द्वितीय विष्णू नरसय्या मुदीराज हिंगोली यांना देण्या आले. सदर स्पर्धेत हजारोच्या संख्येने स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. प्रशासकीय अधिकारी व नागरिक यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :Hingoliहिंगोलीzpजिल्हा परिषद