शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

इन्शुरन्ससाठी मालकानेच रचला कार पळविल्याचा बनाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 19:24 IST

कारमालकाने याची कबुली दिली असून सध्या तो ५ दिवस पोलीस कोठडीत आहे. 

कळमनुरी (जि. हिंगोली) : इन्शुरन्सवर नवीन कार मिळण्यासाठी कार मालकानेच कार पळविण्याचा बनाव केल्याची घटना उघडकीस आली आहे. कारमालकाने याची कबुली दिली असून सध्या तो ५ दिवस पोलीस कोठडीत आहे. 

पुसद येथील मनोज श्रावण राठोड यांनी त्यांची कार क्र. एमएच-२९- बीसी ४२१८ ही चालक अविनाश वानखेडे यांना परभणी येथील किरायाने आहे. तो घेवून जा असे म्हणाला. कारमध्ये ८ फेब्रुवारी रोजी पुसद येथून तीन प्रवासी घेवून निघाला. तुप्पा फाट्याजवळ आल्यानंतर या तिघांनी चालकांना चाकुचा धाक दाखविला. चालकाच्या डोळ्यात मिरचीचे पावडर टाकले व मारहाण केली व जबरीने चाबी हिसकावून चालकाला औंढा नागनाथ येथे पेट्रोलपंपाजवळ फेकून दिले कारसह मोबाईल घेऊन पसार झाले.

ही घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी हा चालक फिर्याद देण्यासाठी ठाण्यात आला. तिघा अज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्हाही दाखल झाला. पोलिसांनी घटनास्थळी जावून तपास केला असता हा प्रकार घडला नसल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले. तेव्हा पोलीसांचा संशय बळावला. त्यांनी कारचालकाला बोलावून पुन्हा सखोल केली व पोलीस खाक्या दाखवताच चालकाने खरी हकीकत सांगितले.

हा कार पळविल्याचा प्रकार खोटा व बनावटी असून कार मालक मनोज श्रावण राठोड याने केला असल्याचे सांगितले. त्यानंतर १७ मार्च रोजी फौजदार शिवसांब घेवारे, जमादार गुलाब खरात, शिवाजी पवार यांनी कार मालकाला पुसद येथून ताब्यात घेतले. त्यालाही पोलिसी खाक्या दाखवताच आपण इन्शुरन्समधून दुसरी कार घेण्यासाठी हा बनावटी नाटक केले. दुसरी नवीन कार उचलून पहिली कार दुसऱ्या नंबरवर चालवायचे असा माझा हेतू होता. असे सांगितले. त्याने कार पळविल्याचे बनावटी नाटक आपण रचल्याचे कबूल केले. 

न्यायालयाने सुनावली कोठडीपळवून नेलेली कार, उस्मानाबाद, लातूर रोडवर सोडण्यात आली होती. उस्मानाबाद पोलिसांनी बेवारस कार रस्त्यावर असल्याचे सांगितले. कळमनुरी पोलिसांनी ही कारही ताब्यात घेतली. १८ मार्च रोजी कार मालक मनोज श्रावण राठोड याला येथील न्यायालयात नेले असता न्यायालयाने त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपास पोनि जी.एस. राहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार घेवारे हे करीत आहेत.

टॅग्स :fraudधोकेबाजीArrestअटकPoliceपोलिसHingoliहिंगोली