शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

दुभाजकावरील शोभेची झाडे फुलली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:54 IST

भरधाव वाहनाने धोका वाढला हिंगोली : शहरातील काही मार्गांवर दुचाकी चालक भरधाव वाहने चालवित आहेत. यामध्ये अनेक जणांकडे वाहन ...

भरधाव वाहनाने धोका वाढला

हिंगोली : शहरातील काही मार्गांवर दुचाकी चालक भरधाव वाहने चालवित आहेत. यामध्ये अनेक जणांकडे वाहन चालविण्याचा परवाना नसतानादेखील वाहने चालवित असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही, तसेच वाहतुकीच्या नियमांचे पालनही होत नसल्याचे पहावयास मिळत आहे. भरधाव वाहने चालविणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

बासंबा फाटा - बासंबा रस्ता दुरुस्तीचे काम कासवगतीने

बासंबा - हिंगोली तालुक्यातील बासंबा फाटा - बासंबा रस्त्याचे मजबुतीकरणाचे काम मागील वर्षभरापासून कासवगतीने होत आहे. जागोजागी खराब झालेल्या या रस्त्याचे काम जलदगतीने करण्यात यावे, अशी मागणी बासंबा गावकऱ्यांतून होत आहे.

खानापूर - चिंचोली रस्त्याची दुरवस्था

हिंगोली : तालुक्यातील खानापूर - चिंचोली रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर माेठाले खड्डे असल्याने अनेक वाहनधारकांचे वाहन चालविताना कसरत होत आहे. रस्त्यावरील गिट्टीही उघडी पडली आहे. या उघड्या गिट्टीमुळे अनेक वाहनेही घसरुन पडून अपघात होत आहे. यासाठी हा रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी होते.

पाण्यासाठी वन्य प्राण्यांची भटकंती

बासंबा : हिंगोली तालुक्यातील बासंबा या गावानजीक माळरान आहे. सध्या उन्हाची तीव्रता वाढली असून, अनेक पाण्याचे स्रोत आटले आहेत. यासाठी माळरानातील वन्य प्राणी पाण्यासाठी भटकंती करीत आहेत. अनेकदा पाण्याच्या शोधात हे वन्य प्राणी गावातही शिरल्याचे दिसत आहे.

स्वच्छतागृहाचा वापर होईना

हिंगोली : शहरात जागोजागी स्वच्छता मोहिमेंतर्गत नागरिकांना लघुशंकेसाठी स्वच्छतागृह उभारुन देण्यात आले आहे. या स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली असून, अनेक नागरिक या स्वच्छतागृहाचा वापर न करता शहरात उघड्यावरच लघुशंकेसाठी बसत आहेत. यासाठी स्वच्छतागृहाची दुरुस्ती व्हावी, अशी मागणी सुज्ञ नागरिकांतून होत आहे.

मोकाट जनावरांचा वाहतुकीस अडथळा

हिंगोली : शहरातील गांधी चौक हे बाजारपेठेतील मुख्य ठिकाण आहे. याठिकाणी शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांसह वाहनधारकांची मोठी वर्दळ सुरू असते, पण रस्त्यावर मोकाट जनावरे फिरकत असल्याने या ठिकाणावरील वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. यासाठी या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

गतिरोधक बसविण्याची मागणी

हिंगोली : शहरातील आदर्श कॉलेजजवळील पाण्याची टाकी परिसरात नवीन सिमेंट रस्त्याचे काम झाले आहे. या नवीन रस्त्यांवरून अनेक वाहनधारक आपली वाहने भरधाव वेगाने चालवत आहेत. या रस्त्यावरच आदर्श कॉलेज व नागरिकांचे घर असून, विद्यार्थी व नागरिकांना रस्त्यावरून ये-जा करताना मोठा धोका निर्माण होत आहे. यासाठी या रस्त्यावर गतिरोधक बसवावे, अशी मागणी होत आहे.