शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘मुन्नाभार्इं’ विरुद्ध कारवाई करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 23:11 IST

जिल्हास्तरावर विशेष दक्षता पथकांची नेमणूक करुन बोगस वैद्यकीय व्यावसायिकांविरुद्ध धाडसत्र मोहीम राबवून बोगस डॉक्टरांवर आळा घालण्यासाठी कायदेशीर कारवाईचे निर्देश जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी दिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हास्तरावर विशेष दक्षता पथकांची नेमणूक करुन बोगस वैद्यकीय व्यावसायिकांविरुद्ध धाडसत्र मोहीम राबवून बोगस डॉक्टरांवर आळा घालण्यासाठी कायदेशीर कारवाईचे निर्देश जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी दिले आहेत.जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित बोगस वैद्यकीय व्यावसायिकांवर आळा घालण्यासाठी व प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी स्थापन जिल्हास्तरीय पुनर्विलोकन बैठकीत जिल्हाधिकारी जयंवशी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड, अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत काळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीवास, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, पोलीस उपअधीक्षक (गृह) सुजाता पाटील आदी उपस्थित होते. जयवंशी म्हणाले, बोगस डॉक्टरांमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. जिल्ह्यातील कार्यरत असलेल्या बोगस वैद्यकीय व्यावसायिकांची माहिती घेऊन दोषींविरुद्ध पोलीस विभागामार्फत रीतसर कारवाई करावी. तसेच न्यायप्रविष्ट प्रकरणांतील दोषी आरोपी पुन्हा बोगस वैद्यकीय व्यवसाय करीत असेल तर त्यांच्याविरुद्ध आरोग्य व पोलीस विभागाने कडक कारवाई करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी जयवंशी यांनी दिल्या. जवळील परिसरात कुठलीही मान्यता प्राप्त पदवी नसताना एखादी व्यक्ती वैद्यकीय व्यवसाय करत असल्याचे आढळून आल्यास सदर गावातील पोलीस पाटील, ग्रामसेवक, सरपंच व तलाठी यांनी त्वरित तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्यांना कळवावे. अन्यथा संबंधितांवर सहआरोपी म्हणून जबाबदार धरून कडक कार्यवाही करण्यात येईल, अशा सूचनाही दिल्या. जनतेने सतर्क राहून बोगस वैद्यकीय व्यावसायिकांकडून कोणतेही औषधोपचार घेऊ नये, असे आवाहनही जयवंशी यांनी केले.महाराष्ट्र वैद्यक व्यवसायी अधिनियम १९६१ मधील कलम ३७ खालील तरतुदीच्या आधारे ग्रामीण भागात व्यवसाय करण्यास अनुमती देता येत असल्याची माहिती देऊन जिल्ह्यातील बोगस डॉक्टरविरुध्द केलेल्या कारवाईचा आढावा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीवास यांनी बैठकीत सादर केला.

टॅग्स :docterडॉक्टरHealthआरोग्य