शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कृषी सहायकाच्या निलंबनाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 23:21 IST

शेततळ्यांचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण न करणाºया कृषी सहायकांवर निलंबनाची कारवाई करण्याचा आदेश जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिला आहे. तर दोन कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्यास आदेशित केल्याने कामे न करणाºया इतरांच्या उरातही धडकी भरली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शेततळ्यांचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण न करणाºया कृषी सहायकांवर निलंबनाची कारवाई करण्याचा आदेश जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिला आहे. तर दोन कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्यास आदेशित केल्याने कामे न करणाºया इतरांच्या उरातही धडकी भरली आहे.जलयुक्त शिवार योजनेच्या कामांबाबत जिल्हाधिकाºयांनी आज आढावा घेतला. यावेळी सीईओ एच.पी.तुम्मोड, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी विजय लोखंडे, विभागीय वनाधिकारी केशव वाबळे, रोहयो उपजिल्हाधिकारी खुदाबक्ष तडवी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकाºयांनी २0१६-१७ ची कामे मार्चपर्यंत प्राधान्याने पूर्ण करण्याची कडक सूचना दिली. तर महसूलच्या उपविभागीय अधिकाºयांकडे समितीची सूत्रे असतानाही त्यांचा यात सक्रिय सहभाग दिसत नाही. त्यामुळे पुन्हा एक संधी देत असल्याचे सांगून यानंतर रडारवर घेण्याचा इशारा दिला. २0१७-१८ ची कामे जवळपास ५0 टक्क्यांपर्यंत आली असली तरीही उर्वरित कामे अजून सुरू नाहीत. त्यामुळे ती तत्काळ सुरू केल्यास जूनपर्यंत हा आराखडा पूर्ण करणे शक्य होईल, असे भंडारी यांनी सांगितले.शेततळ्यांचे उद्दिष्ट पूर्ण न करणाºया कृषी सहायकांना जिल्हाधिकारी भंडारी यांनी चांगलेच धारेवर धरले. प्रत्येकाचा स्वतंत्र आढावा घेतला. यात ज्यांचे काम अतिशय संथ होते, अशांना २८ फेब्रुवारीची मुदत दिली. तर खोकले नामक कृषी सहायकाने एकही शेततळे न केल्याने निलंबनाचा आदेश काढण्यास सांगण्यात आले. तर बैठकीस गैरहजर राहणाºया सात ते आठ कृषी सहायकांचे एक दिवसाचे वेतन कापण्याचा आदेश दिल्याचेही सांगण्यात आले. अडीच हजार शेततळ्यांचे उद्दिष्ट होते. त्यापैकी १३५0 पूर्ण झाले आहेत. प्रति कृषी सहायक २0 याप्रमाणे उद्दिष्ट होते. अनेकांनी दहापेक्षा जास्त कामे केली. यापेक्षा कमी काम करणाºयांची हजेरी घेण्यात आली.कंत्राटदार काळ्या यादीतसंजीवनी कंस्ट्रक्शन नांदेड व व्ही.एस. लांडगे हिंगोली या दोन कंत्राटदारांनी डिग्रसवाणी व लासीना येथील प्रत्येकी दोन सिमेंट बंधाºयाची कामे केली नसल्याने त्यांना काळ्या यादीत टाकण्याचा आदेशही जिल्हाधिकाºयांनी दिला. गेल्यावर्षीची ही कामे अद्याप सुरूच झाली नाहीत. तर कंत्राटदारांची बहाणेबाजी सुरू असल्याचे सांगितले जाते.