शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

महावितरणला भरपाईचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 00:03 IST

वीज जोडणी न देताच ग्राहकाच्या माथी बिल थोपवल्याने व अवाजवी बिल दिल्यामुळे विद्युत वितरण कंपनीने ग्राहकास नुकसान भरपाई द्यावी, असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचने दिला आहेत. दोन प्रकरणांत असा निर्णय दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : वीज जोडणी न देताच ग्राहकाच्या माथी बिल थोपवल्याने व अवाजवी बिल दिल्यामुळे विद्युत वितरण कंपनीने ग्राहकास नुकसान भरपाई द्यावी, असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचने दिला आहेत. दोन प्रकरणांत असा निर्णय दिला आहे.औंढा नागनाथ तालुक्यातील माथा येथील राजाबाई रामजी खराटे यांनी कार्यकारी अभियंता व कनिष्ठ अभियंता महावितरण हिंगोली यांच्याविरूद्ध जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचाकडे २९ नोव्हेंबर २०१७ रोजी तक्रार अर्ज दाखल केला होता. राजाबाई यांची माथा येथे जमीन असून त्यांनी महावितरणकडे शेतीपयोगाकरिता वीजपुरवठ्यासाठी महावितणकडे ७ हजार १०० रूपये रक्कम भरून कोटेशन भरले. परंतु वीजपुरवठा करण्यात आला नाही. याबाबत तक्रारदारांनी वारंवार वीजजोडणीसाठी निवेदने दिली. तरीही कार्यवाही न झाल्याने पाच वर्ष शेती पिकांचे नुकसान झाले. विशेष म्हणजे वीजपुरवठा केला नसतानाही महवितरणने राजाबाई खराटे यांना वीजबिल पाठविले. याबाबत त्यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचाकडे दाद मागितली. सदर खटला न्याय मंचात चालला.विरूद्ध पक्षाने तक्रारदार यास एकरक्कमी नुकसान भरपाई एक लाख रूपये एका महिन्यात द्यावी. तसेच सत्वर वीज जोडणी आजपासून एक आठवड्यात द्यावी. अन्यथा त्यानंतर प्रतिदिन शंभर रूपये खर्च व नुकसान म्हणून द्यावी लागेल.तक्रारदारास दिलेले वीजबिल रद्द करावे व सदर प्रकरणाचा पाच हजार रूपये खर्च महावितरणने द्यावा, असा आदेश न्याय मंचचे अध्यक्ष एस. के. कुळकर्णी, सदस्या एन. के. कांकरिया यांनी दिले.महावितरणच्या अवाजवी वीज बिलांमुळे वीज ग्राहक वैतागले आहेत. अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. महावितरणचे अधिकारीही वीज ग्राहकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचे सांगितले जात आहे.तक्रार : जिल्हा ग्राहक तक्रार निवारणचा दणकाडॉ. महेश मधुकरराव सवंडकर यांनीही कार्यकारी अभियंता राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या. शहर विभाग, हिंगोली व सहाय्यक अभियंता विद्युत कंपनी वसमत यांच्याविरूद्ध न्याय मंचात १२ डिसेंबर २०१७ रोजी तक्रार अर्ज दाखल केला होता. विरोधी पक्षाने वीज ग्राहकास नुकसान भरपाईचे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचचे अध्यक्ष एस. के. कुळकर्णी यांनी ९ आॅक्टोबर २०१८ रोजी दिले. संवडकर यांना महावितरणने दिलेले ५९ हजार ४०० रूपये वीजबिल बेकायदेशिर घोषित केले. महावितरणने मार्च २०१६ ते मार्च २०१७ या वर्षाच्या काळासाठी रक्कम १७ हजार ६०८.१४ ऐवढे विजबिल स्वीकारणे व ते अंतिम भरलेल्या रक्कमेतून जमा करून घ्यावे. उर्वरित रक्कम १२ हजार ३९२ विरोधी पक्षाने तक्रारदार सवंडकर परत करावी. तसेच मानसिक त्रास झाल्याने ५ हजार रूपये देण्याचा आदेश पारित केला.

टॅग्स :mahavitaranमहावितरणCourtन्यायालय