शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

इनामी जमिनींबाबत पुन्हा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 00:57 IST

बेकायदेशीररीत्या हस्तांतरित झालेल्या जमिनी पुन्हा संबंधित संस्थानाच्या नावाने करण्याबाबत पुनरिक्षणाच्या प्रलंबित प्रकरणांवर पुन्हा शासनाने निर्देश दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. यापूर्वीही पुनरिक्षणाचे आदेश दिले असतानाही अनेक ठिकाणी अशी प्रकरणे प्रलंबित आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : बेकायदेशीररीत्या हस्तांतरित झालेल्या जमिनी पुन्हा संबंधित संस्थानाच्या नावाने करण्याबाबत पुनरिक्षणाच्या प्रलंबित प्रकरणांवर पुन्हा शासनाने निर्देश दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. यापूर्वीही पुनरिक्षणाचे आदेश दिले असतानाही अनेक ठिकाणी अशी प्रकरणे प्रलंबित आहेत.देवस्थान, वक्फच्या इनामी जमिनी कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता अनेकांनी हस्तांतरित करून घेतल्याच्या तक्रारी होत्या. अशा प्रकरणांचे पुनरिक्षण करण्याचा आदेश २0१0 मध्ये देण्यात आला होता. त्यानंतर यामध्ये वेळोवेळी सुधारणा केल्या होत्या. मात्र तरीही अनेक जिल्ह्यांमध्ये अशी प्रकरणे प्रलंबित असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. यामध्ये अनेक ठिकाणी विविध अडचणी येत असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे अशा प्रकरणांत सदर संस्थानच्या विश्वस्तांचा शोध घेवून त्यांच्या ताब्यात जमिनी द्याव्यात. ते नसल्यास धर्मादाय आयुक्त अथवा राज्य शासनानेच अशा जमिनींचे संरक्षण करण्यास सांगितले आहे.महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात संस्थानांच्या व वक्फ बोर्डाच्या जमिनी आहेत. मात्र त्यात अनेक ठिकाणी इतरांनीच बेकायदेशीर ताबा घेतल्याच्या तक्रारी अजूनही कायम आहेत. अशी अनेक प्रकरणे न्यायप्रविष्ठ असताना शासनाने दिलेल्या आदेशानंतरही यात अनेक जिल्ह्यांत महसूल प्रशासनाकडून योग्य ती कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या आदेशाद्वारे पुन्हा कारवाईचे निर्देश दिले. आता या निर्णयानंतर याला गती येण्याची शक्यता आहे. या निर्णयात हा विषय विभागीय आयुक्तांनी दरमहा आढाव्यात घेण्यासही सांगितले आहे. यामुळे इनामी जमिनींचे संरक्षण करण्यासाठी पुन्हा एकदा शासनाने पावले उचलल्याचे चित्र दिसत आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीCourtन्यायालय