शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात ३१ टक्के शेतकऱ्यांचीच माहिती ‘पीएम-किसान सन्मान’मध्ये अपलोड; दोन हजारांचा पहिला हप्ताही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 15:39 IST

विधानसभेपूर्वी तरी पहिला हप्ता मिळणार का?

ठळक मुद्देदुसऱ्या टप्प्याने पेन्शनचा प्रवास बनला खडतरनागपूर महसूल विभाग सर्वांत मागे

- विजय पाटीलवसमत (जि.हिंगोली) :  किसान सन्मान योजनेचा लोकसभा निवडणुकीमुळे गडबड करून शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्यासाठी प्रशासनाला कामाला लावले होते. मात्र तरीही राज्यातील केवळ ३५.१६ टक्के शेतकऱ्यांचीच माहिती वेबसाईटवर अपलोड झाली आहे. यात नागपूर विभाग सर्वांत मागे आहे. आता विधानसभेपूर्वी तरी पहिला हप्ता मिळणार का? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या कामाला फेब्रुवारी २0१९ मध्ये प्रारंभ झाला होता. मार्च महिन्यात सहा हजारांपैकी दोन हजारांचा पहिला हप्ता देण्याची घोषणा झाली होती. मात्र प्रातिनिधीक स्वरुपात काही शेतकऱ्यांच्या खात्यावरच रक्कम जमा झाली. नंतर ती काढूनही घेण्याचे प्रकार काही ठिकाणी घडले. पूर्वी या योजनेत १.४२ लाख कुटुंबांची माहिती अपलोड करायची होती. केवळ अल्पभूधारकांचाच म्हणजे २ हेक्टर जमीनधारणा असलेल्या कुटुंबालाच हा लाभ मिळणार होता. आता बहुभूधारकांचाही  समावेश करण्यात आला आहे. केवळ कर्मचारी, लोकप्रतिनिधीच बाजूला राहणार आहेत. योजनेची व्याप्ती वाढल्याने हिंगोलीत २.३२ लाख कुटुंबांची माहिती वेबसाईटवर अपलोड करावी लागणार आहे. पूर्वीच्या त्रुटी दूर केल्याने १.३८ लाख पात्र कुटुंबांचीच माहिती अपलोड झालेली आहे. आता ९३ हजार ७८५ कुटुंबांची माहिती भरणे शिल्लक आहे. यापैकी ७४८0 कुटुंबांची माहिती २ जुलैला वेबसाईटवर भरली. तर ३५ हजार २६८ कुटुंबांची माहिती तयार आहे. हिंगोली जिल्ह्याचे लाभार्थ्यांच्या तुलनेत ३७.६१ टक्के काम पूर्ण झाले आहे.

योजनेची व्याप्ती वाढल्याने पेन्शनसाठी शेतकऱ्यांना आणखी वाट पहावी लागणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी खात्यावर पहिला हप्ता जमा होईल की नाही, याची चिन्हे दिसत नाहीत. जिल्ह्यातील विविध भागातून मागील काही दिवसांपासून या योजनेतील पेन्शनचा लाभ मिळावा, यासाठी निवेदने प्रशासनाला सादर झाली होती. मात्र थेट एनआयसीकडून आॅनलाईन रक्कम खात्यावर जमा होणार असल्याचे सांगितले जाते.

नागपूर महसूल विभाग सर्वांत मागेराज्यातील १.0५ कोटी शेतकरी कुटुंबांची माहिती वेबसाईटवर अपलोड करायची आहे. यापैकी ५२.९३ लाख कुटुंबांची माहिती अपलोड झाली आहे. तर तेवढीच शिल्लक आहे.यात महसूल विभागनिहाय कोकण-१४.३६ टक्के, नाशिक-५२ टक्के, पुणे-४६.३६ टक्के, औरंगाबाद-२८.८७ टक्के, अमरावती-४२.९३ टक्के तर नागपूरमध्ये ८.८२ टक्के माहिती अपलोडिंगचे काम झाले आहे. राज्यात सर्वांत पुढे नाशिक तर मुख्यमंत्र्यांचा नागपूर महसूल विभाग सर्वांत मागे आहे. राज्यात ८५ टक्के माहिती अपलोड करून अव्वल नंदुरबार आहे. सर्वांत जास्त ५.७४ लाख कुटुंबांची माहिती सोलापूरला अपलोड करायची असून ६७.१२ टक्के काम पूर्ण झाले आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रprime ministerपंतप्रधानgovernment schemeसरकारी योजना