शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

मुद्रा लोनसाठी दिल्लीतून आला फोन, मंजुरीचे आमिष देऊन केली ऑनलाईन फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 13:58 IST

फाईल मंजूर झाल्याचे सांगत वेळोवेळी फोन करून पैसे मागितले

ठळक मुद्देदिल्लीतून आला फोन फाईल मंजुरीसाठी वेळोवेळी मागितले पैसे

आखाडा बाळापूर (जि. हिंगोली) : पंतप्रधान मुद्रा लोन मिळवून देण्याचे अमिष दाखवत डोंगरकडा येथील तरुणाची १ लाख ६ हजार ९३४ रुपयांची आॅनलाईन फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध  १३ मार्च रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रंजेश तुळशीराम इंगोले (२२, रा. शिरसाळा, तालुका मालेगाव, जि. वाशिम, हल्ली मुक्काम डोंगरकडा) या विद्यार्थ्यास गुडगाव हरियाणा येथून मंजीत महाटो याचा फोन आला. नवी दिल्ली येथून डीआयसी आॅफिसमार्फत बँक आॅफ बडोदा शाखा नवी दिल्ली येथून तुमचे मुद्रा लोन मंजूर करण्यासाठी कागदपत्रे पाठविण्याचे त्याने सांगितले. 

त्यानंतर फाईल मंजूर झाल्याचे सांगत वेळोवेळी फोन करून २५ हजार, १० हजार, १८ हजार, २४ हजार, ३५ हजार व ३६ हजार असे एकूण १ लाख ६ हजार ९३४ रुपये गुडगाव हरियाणा येथील खात्यात भरायला लावले. नंतर कर्ज वगैरे काही मिळाले नाही. या प्रकरणी रंजेश  इंगोले यांच्या तक्रारीवरून डीआयसी आॅफिस नवी दिल्ली येथील मिश्रा, बँक आॅफ बडोदा शाखा नवी दिल्ली येथील विजय मिश्रा व कोटक महिंद्रा फायनान्स सि. ए. मंजित महाटो असे नाव सांगणाऱ्या या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीcyber crimeसायबर क्राइमHingoliहिंगोली